Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चांदवड : वडनेर भैरव शिवारात अवैध जुगार अड्ड्यावर छापा

Share
अवैध दारूविक्री; जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई, Latest News Illegal Alcohol Sales Action Akole

नाशिक : जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन गहोण्यासाठी अवैधरित्या चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान पोलीस पथक गस्त घालत असतांना अवैध जुगाराची माहिती मिळाल्याने अचानक वडनेर भैरव येथील जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. २४) रोजी चांदवड तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी गस्त घालत होते. स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री.के.के. पाटील यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, काही इसम हे वडनेर भैरव गावातील तांबे लॉन्स परिसरात अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार स्थागुशा पथकाने वडनेर भैरव शिवारातील तांबे लॉन्स परिसरात अवैधरित्या सुरू असलेले जुगार अड्ड्यावर अचानकपणे छापा टाकला. सदर छाप्यात एकुण आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या इसमांकडून ६८ हजार ४७० रुपये व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

दरम्यान आनंदा राजाराम पवार,रा.वडाळीभोई, नितीन चंद्रकांत बागलाणे, रा.चिंच खेडरोड, पिंपळगाव बसवंत, निलेश पंढरीनाथ वक्ते, राहुल राजेंद्र साळुंके, सतीश रवींद्र आंबेकर, अमोल साहेबराव गचाले, महेश रामचंद्र धाकतोडे, सचिन प्रकाश निखाडे, सर्व रा. वडनेर भैरव, ता.चांदवड यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!