चांदवडला तरूणाची आत्महत्या

0

चांदवड| शहरातील हंनूमाननगर भागातील २४ वर्षिय तरूणाने आज (दि.९) रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

दरम्यान ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चांदवड शहरातील हनूमान नगर येथील रहिवाशी राहुल संभाजी काळे (वय २४) याने आपल्या राहत्या घरात सकाळी १० च्या सुमारास लोखंडी आड्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपविले.

याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात वडील संभाजी काळे यांनी खबर दिली. यावरून चांदवड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*