Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : चांदवड : पानी फाऊंडेशन श्रमदानावेळी आदिवासींचा हल्ला; चार जखमी, सहा दुचाकी जाळल्या

Share

चांदवड | प्रतिनिधी

नाशिकच्या चांदवड तालुक्यात पानी फाऊंडेशन अंतर्गत श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांवर आदिवासींच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चौघे जखमी झाले आहेत.

जमावाने 5 ते 6 मोटारसायकलदेखील संतप्त आदिवासींनी जाळल्या. मातेवाडीत तणावाचे वातावरण आहे. हल्यातील जखमींना उपचारासाठी चांदवड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नाशिक जिल्ह्यात दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पानी फाऊंडेशनचे श्रमदान सुरु आहे आज मतेवाडीमधील गावकऱ्यांनी डोंगरउतारावर चर खोदण्याच्या कामास शुभारंभ करत श्रमदान सुरु केले.

याच वेळी आदिवासींनी जेसीबी मशीनचे नुकसान केले. लाठ्याकाठ्यांनी श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांना मारहाण करत चर खोदण्यासाठी विरोध केला. परिसरात तणावाचे वातावरण होते.

चांदवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याठिकाणी परिस्थितीवर काही क्षणातच पोलिसांनी नियंत्रण मिळवले. मात्र अद्याप हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.

जखमी गावकऱ्यांची नावे

भाऊराव चव्हाण वय ५५
संतोष बबन मते वय २९
सुरेखा दगु मते वय ३५
मुन्ना शहा (पोकलंड चालक)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!