Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

चांद्रयान-२ चे प्रक्षेपण रद्द; काय आहेत वैशिष्ट्ये जाणून घ्या

Share

श्रीहरीकोट्टा  | वृत्तसंस्था

तांत्रिक अडचणीमुळे ‘चांद्रयान-२’ चे आज पहाटे होणारे प्रक्षेपण रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोट्टा येथील संशोधन केंद्रात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीदेखील उपस्थिती होती. लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल अशी माहिती  इस्रोकडून देण्यात आली आहे.

आज पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते. भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाल्याचे समजल्यानंतर काहीसा हिरमोड झालेला बघायला मिळाला.

‘चांद्रयान-२’  थोडक्यात

  • चांद्रयान-२ एकूण १२ भारतीय उपकरणे घेऊन जाणार
  • चांद्रयान-२ चे वजन ३.८ टन
  • चांद्रयान-२ चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार होते
  • यामध्ये १३ भारतीय पेलोड असतील त्यातील ८ ऑर्बिटर, ३ लँडर आणि २ रोव्हर असतील.
  • नासाचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील यात आहे.

 

‘चांद्रयान-२’कडून मिळणार ही माहिती

चांद्रयान-२ या मोहिमेद्वारे महत्त्वाचे संशोधन करण्यात येणार आहे. यात चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागातील घटकांचा अभ्यास, चंद्रावर होणार्या भूकंपाची नोंदणी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या पृष्ठभागाच्या नकाशाची नोंदणी, चंद्रासंबंधीची नवीन माहिती मिळविणे सोपे होणार होते

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!