Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

राज्यपालांची भेट झाली; पुढे काय करायचे ते ठरवू – चंद्रकांत पाटील

Share

मुंबई । प्रतिनिधी 

राज्यातील जनतेने शिवसेना भाजप युतीला कौल दिला आहे. मात्र, शिवसेना भाजपमध्ये जे काही ठरले असावे यावर राज्यात मुख्यमंत्री कुणाचा? यावरून सध्या घमासान माजले आहे. अशातच आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. भेट झाली आता पुढचे नियोजन ठरवू या शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने कौल दिला आहे. परंतु सत्तास्थापनेत विलंब होत असल्याने चर्चेसाठी राज्यपालांची भेट आज भाजपच्य पदाधिकाऱ्यांनी घेतली.

यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी अनेक प्रश्नांना बगल दिली. ठोस काहीही सांगितले नाही.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दलही भाजपचं मौन कायम पाहायला मिळालं. सरकार स्थापन करण्यासंदर्भात कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा केली. पुढे काय करायचे याबाब लवकरच निर्णय घेऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!