Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

संकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर

Share

मुंबई | प्रतिनिधी

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नुकतेच नियुक्तीपत्र पाटील यांना दिले आहे. तर मुंबईसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मंगल प्रताप लोढा यांची वर्णी लागली आहे.

सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सत्तधारी भाजपने देखील पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी तयारी चालवली आहे.

आज राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी राजीनामा दिला. त्यांनतर रिक्त झालेल्या त्यांच्या जागी चंद्रकांत दादा पाटील यांची वर्णी लावण्यात आली आहे.

चंद्रकांत दादा यांनी शिवसेना भाजपमधील विकोपाला गेलेले संबंध जुळवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक बड्या नेत्यांचे निकटवर्तीय आहेत.

शिवाय, त्यांचे इतर मित्रपक्षांशी संबंध चांगले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीकडे बघता चंद्रकांत दादा यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!