Type to search

Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

निकालाआधीच दिल्लीत गरमागरमी

Share

चंद्राबाबू गांधी, पवारांच्या भेटीला

नवीदिल्ली- लोकसभा निवडणूक निकालापूर्वी दिल्लीत राजकीय गरमागरमी सुरू झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

चंद्रबाबू नायडू यांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. चंद्राबाबूंच्या या भेटीगाठी म्हणजे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीने विशेष राज्याच्या दर्जावरुन भाजपसोबत एनडीएतून फारकत घेतली. सध्या ते यूपीएच्या नेत्यांसोबत दिसतात. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशातील सपा नेते अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती यांच्याही भेट घेणार आहेत. चंद्राबाबू नायडू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर लखनऊकडे रवाना झाले. तिथे ते मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत.

सोनियांनी बोलविली बैठक
लोकसभा निकालादिवशी म्हणजेच 23 मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. एकंदरीत ही सर्व स्थिती पाहता विरोधकांनी निकालापूर्वीच सत्तास्थापनेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केल्याचे चित्र आहे.

पुन्हा मोदी सरकार : शाह
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा दावा केला. अमित शाह यांनी काल शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत पाहायला मिळाले. मोदींनी आपले मत व्यक्त केले, मात्र पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना अमित शाह यांनीच उत्तरे दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!