Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चांदवड : सतरा वर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Share

काजीसांगवी : दरसवाडी-डोंगरगाव येथील कालव्यात बुडून एका सतरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहीत प्रंशात कांबळे (१७) असे तरुणाचे नाव आहे. अकरावी महाविद्यालयीन विद्यार्थी काल दि. 22रोजी दुपारी मित्रासोबत दहिवद शिवारातील पिरसाई मंदीराजवळी दरसवाडी डोगरगाव कालव्यावर गेला असता त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.

दरम्यान अधिक माहिती अशी कि, पाटे येथील रोहित मित्रासमवेत (दि.२२) रोजी दहिवद शिवारातील पिरसाई मंदीराजवळील दरसवाडी डोगरगाव कालव्यावर पोहण्यासाठी गेला होता. या कालव्यात पाणी सोडले असल्याने पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने रोहितच बुडून मृत्यू झाला.
रात्री उशीरापर्यत त्याचा मृतदेह शोधाशोध केली असता मृतदेह सापडला नाही. त्यामुळे (दि. २३) रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास  जीव रक्षकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात  मृत्युची नोंद करण्यात आली. यानंतर रोहितवर पाटे येथे शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!