Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

चंदनापुरीत बाजरीच्या 18 पोत्यांची चोेरी

Share

संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ असलेल्या जावळेवस्ती येथील राजेंद्र आंबुजी राहाणे या शेतकर्‍याच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बाजरीची 18 पोती चोरल्याची घटना नुकतीच घडली.

जावळे वस्ती (चंदनापुरी) येथील रहिवसी राजेंद्र रहाणे यांनी आपल्या मळ्यातील खोलीमध्ये बाजरीची 18 पोती ठेवली होती. पण शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 ते गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास रहाणे हे मळ्यात गेले असता त्यावेळी त्यांना खोलीमध्ये बाजरीची 18 पोती कमी दिसली. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ती चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

25 हजार रुपये किंमतीच्या बाजरीच्या गोण्या होत्या. याप्रकरणी राजेंद्र राहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 403/ 2019 नुसार भारतीय दंड संहिता 379 प्रमाणे दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार इस्माईल शेख हे करत आहेत.

दरम्यान महिनाभर सुरू असलेल्या परतीच्या भीज पावसामुळे अनेक शेतकर्‍यांच्या बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी अक्षरश: बाजरीच्या कणसांना मोड आले होते. असे असताना देखील रहाणे यांनी बाजरीची सोंगणी करुन धान्य तयार करुन ते मळ्यातील शेतामध्ये असलेल्या खोलीमध्ये ठेवले होते. पण त्या बाजरीच्या गोण्यांवरही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. तसेच या ठिकाणी जवळपास असलेल्या नरेंद्र जगन्नाथ रहाणे यांच्या शेडमधून परवा रात्री विद्युत मोटारीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.

दोनच महिन्यापूर्वी चंदनापुरी येथील विवेकानंद रामदास रहाणे यांच्या शेतामधून डाळिंबाचे 200 कॅरेट चोरून नेल्याची घटना घडली. या परिसरात वारंवार चोर्‍या होऊ लागल्या आहेत. या चोेरट्यांचा पोलिसांनी तपास लावावा अशी मागणी चंदनापुरी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!