Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

चाळीसगावात ६१ टक्के मतदान ; आठ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Share

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यात ५५.६६ टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत तालुक्यात एकूण ६१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे.

किरकोळ वाद वगळता तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत मतदानचा अचूक आकडेवारी येण्याची शक्यता आहे. आता गुरुवार(दि.२४) निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील मतदानाची टक्केवारी व दिवसभर चालेल्या राजकिय चर्चांचा अंदाजामुळे तालुक्यात धक्कादायक निकाल लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चाळीसगांव विधानसभेसाठी राजीव अनिल देशमुख (राष्ट्रवादी), मंगेश रमेश चव्हाण (भाजपा), मोरसिंग गोमा राठोड (वंचीत आघाडी), राकेश लालचंद जाधव (मनसे) आणि ओंकार पितांबर केदार (बसपा) अशा पाच पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष म्हणून डॉ.विनोद मुरलीधर कोतकर, उमेश प्रकाश कर्पे, विनोद माधवराव सोनवणे अशा एकूण आठ उमेदवारांचे भवित्व सोमवारी झालेल्या मतदानात मतपेटीत बंद झाले आहे. आता गुरुवार (दि.२४) निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून तालुक्यात धक्कादायक निकाल लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!