Type to search

Breaking News DT Crime Watch जळगाव

चाळीसगाव : आठ लाख ७० हजाराचा कापूस चोरी प्रकरणी चार जण अटकेत

Share

चाळीसगाव पोलिसांची मोठी कामगिरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) –

गुजरात येथे विक्रीसाठी जात असलेला 15 टन कापसाचा ट्रक चाळीसगाव येथील कोदगाव चौफुली जवळ अडवून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख 70 हजारांचा कापूस लांबवला होता.

या प्रकरणी गुप्त माहितीवरून चाळीसगाव पोलिसांनी आज दि.३० नोव्हेंबर रोजी चार जणांना अटक केली आहे, तर तीन फरार आहेत.

पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व आरोपी हे नांदगाव व मालेगाव तालुक्यातील आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!