Type to search

आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

पाटणादेवी यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ : निसर्ग सौंदर्याने परिसर फुलला

Share

मनोहर कांडेकर

चाळीसगाव ।

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान तसेच अनेकांची तालुक्यातसह महाराष्ट्रभर भाविकांची कुलदैवत असलेल्या पाटणादेवी येथील श्री चंडीकादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून (दि.29) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध विभागांची जय्यत तयारी करण्यात आली. तसेच चाळीसगाव एसटी आगारातर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

चंडीकादेवींच्या यात्रात्सव काळात अख्यां महाराष्ट्रासह गुजराथ, मध्य प्रदेश राज्यातून मोठया संख्येने भाविक पाटणादेवी येथे दर्शनासाठी येतात. पाळणे, खेळणी, सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तु विक्रीच्या दुकानांमुळे परिसर गर्दीने फुलून जातो. यात्रा कालावधीत मंदीर व परिसरात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 अधिकारी तसेच पोलिस कर्मचार्‍यांची कुमक व मंदीर परिसरात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी यात्रे दरम्यान येथे 1 लाख 50 हजार भाविकांनी भेट दिली होती.

यंदा पावसामुळे पाटणादेवी परिसर बहरला आहे. परिसरातील डोंगर माळांनी हिरवा शालु पांघरला असुन नयनरम्य धबधबेही धोधो वाहत आहे. त्यामुळे पाटणादेवी परिसर सौंदर्याने फुलून गेला असल्याने यंदा दोन लाखापेक्षा अधिक भाविक हजेरी लावण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, प्रशासनातर्फे मंदीर परिसरात 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळया दर्शन रागांची सोय करण्यात येणार असून भाविकांच्या सोयी सुविधेसाठी 40 सेवेकरी तैनात असणार आहेत.

घटस्थापनेच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात लगबग- गणेश उत्सवानतंर येणारा दुर्गाउत्सव हा वर्षातील सर्वात मोठ उत्सव मानला जातो. दुर्गाउत्सवात अनेकाची घरी घटस्थापना केली जाते. शनिवारी घटस्थापनेच्या खरेदीसाठी चाळीसगाव येथील बाजारात ग्राहकांची एकच लगबग दिसून आली. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसभर गर्दी दिसून येत होती. बाजारात घट, फुले, देवीच्या पुजेसाहित्या, दुर्गामुर्त्या आदि विक्रेत्यांचे दुकाने जागो-जागी दिसून येत होते.
तसेच तालुक्यातून नवदुर्गामित्र मंडळाचे कार्यकर्ते देखील दिवसभर दुर्गा मुर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!