Type to search

जळगाव

चाळीसगाव न.पा.ची बैठक कोरम अभावी तहकूब

Share

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव नगर परिषदेची स्थायी समितीची मिटींग मंगळवारी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली होती. सत्ताधारी व विरोध गटातील सदस्य गैरहजर राहिल्यामुळे ही मिटींग तहकूब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू ज्या मुख्य विषयासाठी मिटींग बोलविण्यात आली होती. तो ‘शिवपुतळा’ आधि बघितल्यानतंरच मिटींग घेण्यात यावी, हेच मिटींग तहकूब करण्यामागचे मुख्य कारण असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आता पुढील मिटींग १६ किवा २० ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे सांगीतले जात आहे.

न.पा.ची स्थायी समिती मिटींग ठरल्याप्रमाणे संकाळी ११ वा. नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार होती. मिटींगसाठी स्वता; नगराध्यक्षा अशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शहवि आघाडीचे सुरेश स्वार आदि वेळेवर उपस्थित होते. तर तब्बल एक तास उशिराने सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, शेख चिरागुद्दीन रफीक शेख, विजया पवार हे मिटींगसाठी आले. तर शहवि आघाडीचे गटनेते मा.आ.राजीव देशमुख, सत्ताधारी भाजपाचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, बापू आहिरे, वैशाली राजपूत आदि मिटींग आले नसल्याची माहिती मिळाली आहे. बर्‍याच वेळ वाट पालिल्यानतंरही बाकी सदस्या न आल्यामुळे ही मिटींग कोरम अभावी अध्यक्षानी मिटींग तहकूब केली. आता ही मिटींग १६ किवा २० ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतू मंगळवारी घेण्यात आलेली मिटींग अचानक तहकूब करण्याचे मागणे अनेक कारणे असल्याचे नगरसेवकांमध्ये चर्चा आहे. परंतू त्यातील मुख्य कारण म्हणजे ‘शिवपुतळ्याचा’ विषय आहे. शहरातील नियोजीत जागी बसविण्यात येणारा शिवपुतळ्यासाठी नवीन वर्कआर्डर काढण्यासाठी आधि प्रत्यक्षात न.पा.चे सर्व सदस्य जावून शिवपुतळा बघतील आणि नतंरच ह्या विषयाला मंजुरी देण्यासाठी मिटींग घ्यावी अशी स्थायी समितीच्या सदस्यांची मागणी असल्यामुळे आज मिटींग होवू शकली नसल्याची चर्चा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!