Type to search

जळगाव

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तीन गावांना बक्षीस

Share

चाळीसगाव | प्रतिनिधी

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत श्रमदानाच्या चांगल्या कामामुळे तालुक्यातील तीन गावांनी बक्षिस पटकावे आहे. यात आभोणे तांड्याने प्रथक क्रमांचे १० लाख रुपयाचे बक्षिस पटकावले आहे, तर व्दितीय ६ लाखांचे जामदा गावाला, तृतीय बोरखेडा गावाला ४ लाख रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. तालुक्यात उभ्या राहिलेल्या श्रमदानाच्या चळवळीमुळे या गावांना बक्षिस मिळाले आहे.

पुणे येथील बालेवाडी क्रिंडा संकुलात अभिनेता आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थित तालुक्यातील गावांना बक्षिस वितरीत करण्यात आले. यावेळी सत्यजित भटकल यांच्या सिनेसृष्टीतील कलाकार यांच्यासह महाराष्ट्रातून जवळपास दहा हजार ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशनची टिम उपस्थित होती. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा सुरुवात ७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता श्रमदानाने केली. ५२ दिवस अखंडितपणे तरुणांनी रात्री ४ तास श्रमदान केले. तुफान आलंया कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडला गावाला १ लाख रुपये मशिन कामासाठी मिळाले. त्यानतंर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिड लाख रुपयांची मदत मिळाली. गावातील सर्व दात्यांनी मिळून ३ लाख रूपयांची वर्गणी जमा केली. त्यातून पोकलॅडच्या साहाय्याने नाला खोलीकरण केले. स्पर्धेदरम्यान माती बांध, एलबीएसबांध, गॅबियन बंधारा,इनलेट आऊटलेट शेततळे, अडीच किलो मीटर नाला खोलीकरण, दगडी पिचिंग, ३ हेक्टर क्षेत्रात सिसीटी, कंपार्टमेंट बंडीग, विहिरी पुर्नभरण, २ सिमेंट बंधारे दुरुस्ती करून गळती बंद केली. २२ जुन रोजी झालेल्या पहिल्या पावसातच वरुण राजाच्या कृपने सर्व रचना पाण्याने भरल्या आणि ४ दिवसातच त्याचा फायदा सर्व विहिरींना झाला आणि कधी नव्हे ते पहिल्या पावसातच विहिरींना मोठ्या प्रमाणावर पाणी आले व भुजल पातळी वाढली. गावाला पाण्याच्या रुपाने अमुल्य असे बक्षिस मिळाले.

या स्पर्धचा निकाल ११ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यात तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस आभोणे तांडाला मिळाले, व्दितीय जमदा गावाला, तृतीय बोरखेडा गावाला बक्षिस मिळाले. चाळीसगाव तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झालेला असूनही येथील शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. या कामासाठी तालुका पाणी फाउंडेशन टिम, सामाजिक संघटना, शासकिय नोकरवर्ग संघटना, गावातील सर्व नोकरवर्ग, सर्व गावकरी, सैनिक, महिला व तुफान सेनेचे शाळकरी मुले यांचे सहकार्य लाभले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!