Type to search

Breaking News जळगाव राजकीय

बोगस मतदान : तक्रार खोटी आढळल्यास सहा महिने शिक्षेची तरतूद – निवडणूक अधिकारी

Share

चाळीसगाव । प्रतिनिधी

मतदानाच्या आदल्या दिवशी साहित्य ताब्यात घेणे, मतदानाच्या दिवशी मतदान पूर्ण होईपर्यंत विविध विहित नमुने भरणे, मोकपोल घेणे, मतदाराच्या ओळखीसाठी असलेले 11 पुरावे, मतदान कक्षातील मतदान अधिकारी यांची जबाबदारी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. चुकीचे मतदान होत असल्याची तक्रार मतदाराने केल्यास त्याच्याकडून विहित नमुन्यातील प्रतिज्ञा पत्र भरुन घ्यावे, तक्रार खोटी आढळल्यास तक्रार कर्त्यास 6 महिन्यांची जेल व एक हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतुद असल्याचे प्रातांधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी चाळीसगाव येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे चाळीसगाव तालुक्यातील शेवटचे प्रशिक्षण आज येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण (राष्ट्रीय महाविद्यालय) महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर हे बोलत होते. याप्रसंगी तहसिलदार अमोल मोरे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, निवासी नायब निवडणूक नायब तहसिलदार एन. व्ही. भालेराव, महसूल विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपण आता निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहोत. निवडणूक आयोगाने तुमची सेवा निवडणूक काळापुरती अधिग्रहीत केली आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी पहिले प्रशिक्षण असले तरी चाळीसगाव तालुक्याचे तिसरे आणि शेवटचे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण हे निवडणूकीचा महत्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अधिकारी कर्मचार्‍यांना कोणतीही अडचण येवू नये, आपल्या अडचणीमुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा येवू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते. याबाबत कोणत्याही अडचणी असल्यास त्या सोडविण्यात येतील.

यावेळी महाविद्यालयातील 12 वर्ग खोल्यांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्र व इव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण कर्मचार्‍यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी दिले. यावेळी सर्व्हीस वेाटरचे अर्ज स्विकारण्यासाठी दहा टेबल लावण्यात आले होते. तसेच प्रोसेसिंग ऑफिसरांना भारत निवडणूक आयोगाकडील पुस्तकाचे वाटपही करण्यात आले. व त्यांची लेख परिक्षा घेण्यात आली. हे प्रशिक्षण आज दोन सत्रात घेण्यात आले. या प्रशिक्षणास दोन हजार कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!