Type to search

Featured जळगाव राजकीय

चाळीसगाव न.पा.विषय समिती सदस्यांची निवड ; भाजपाचे चार तर अपक्ष एक

Share

हात उंच करुन मतदान, पाच विरोधी सहा मतांनी भापाचे सदस्य विजयी

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव नगरपालिकेच्या विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत सेना-भाजप युतीने अपक्षांच्या मदतीने बाजी मारली. आरोग्य समितीसाठी शहरवि आघाडीच्या अलक गवळी यानी ऐनवेळेस माघार घेतल्यामुळे आरोग्या सभापती पदी अपक्ष नगरसेविका सायली रोशन जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दि.९ जानेवारी रोजी विशेष समिती सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी पिठासीन आधिकारी म्हणून तहसीलदार अमोल मोरे हे उपस्थित होते. तर निवडणुक प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी विकास नवाळे, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण आदि उपस्थित होते.

सभापतीच्या निवडीसाठी अर्ज भरण्यासाठी ११ वाजेची वेळे देण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही गटातील सदस्यांनी आपले अर्ज सादर केलेत. त्यानतंर १२ वाजेला न.पा.च्या मुख्यसभागृहात सभापतीच्या निवड प्रक्रियेस सुरुवात झाली.

पिठासीन आधिकारी अमोल मोरे यांनी पाच सभापतीसाठी दाखल अर्जांचे वाचन केले. यात सार्वाजनी बांधकामसाठी विजया प्रकाश पवार(सेना-भाजपा), शेखर गुलाब देशमुख(शहवि आघाडी). शिक्षण समितीसाठी घृष्णेश्‍वर पाटील(भाजपा), दिपक उत्तमराव पाटील(शहवि आघाडी). स्वच्छता, आरोगसाठी सायली रोशन जाधव(अपक्ष), अलका सदाशिव गवळी(शहवि आघाडी). पावी पुरवाठसाठी मानसिंग राजपूत(भाजपा), सुर्यकांत तुकाराम ठाकुर(शहवि आघाडी) यांचे अर्ज सादर करण्यात आले होते. पिठासीन आधिकारी यांनी अर्जांची छाननी केल्यानतंर सर्व अर्ज वैद्य ठरवले. यावेळी शहविआघाडीचे नगरसेवक सुर्यकांत ठाकुर यांनी भाजपाच-शिवसेना युतीतर्फे सार्वजनिक बांधकाम सभापतीसाठी दाखल करण्यात आलेल्या नगरसेविका विजया पवार यांच्या अर्जावर हरकत घेतली. एक व्यक्ती अनेक सभापतीवर पदावर राहुन शकत नसल्याची नियमावलीचे वाचन करुन, गटनेते राजीव देशमुखसह सुर्यकांत ठाकुर यांनी सभागृहाच्या निर्देशनास आनुन दिले. परंतू तो नियम ‘क’ वर्ग नगरपरिषद तथा स्थायी समितीच्या सदस्यांसाठी असल्याचे खुलासा यावेळी मुख्याधिकार्‍यांनी केला.

त्यावर आमचे आमची हरकत आम्ही लेखी स्वरुपात देतो, त्यावर तुम्ही निर्णय घ्या म्हणून सुर्यकांत ठाकुर यांनी सभागृहात सांगीतले. त्यानतंर पिठासीन आधिकार्‍यांनी सर्व अर्ज वैद्य ठरवत प्रत्यक्षात निवडणुकीस सुरुवात केली. विषय समितीच्या सदस्यांनी हात उंच करुन मतदान करावे अशी सूचाना पिठासीन आधिकार्‍यांनी केली. त्यानतंर मतदान घेण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम सभापतीसाठी शिवसेनेच्या विजया पवार तर शहर आघाडीच्या वतीने शेख देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यात शिवसेनेच्या विजया पवार तर शिक्षण समिती सभापतीपदी भाजपाचे घृष्णेश्वर पाटील, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी झेलाबाई पुंडलिक पाटील, पाणी पुरवठा समिती सभापती मानसिंग शामसिंग राजपूत यांची निवड झाली.

सार्व. बांधकाम व शिक्षण, महिला बालकल्याण, पाणी पुरवठा समिती सभापतीसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-सेना युतीच्या उमेदवाराने ६ तर शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना ५ मते मिळाली. नगरपालीका सभापती निवडीतील महाविकास आघाडीचा प्रयोग होऊन सभापती पदांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी ठरतील असा अंदाज व्यक्त केला जात असतांना,  सेना-भाजप युती नगरपालिकेत  कायम राहिल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग येथे अयशस्वी ठरल्यामुळे विशेष समिती सभापती पदांवर सेना-भाजपाचे निर्विवाद वर्चस्व दिसून आले.

दरम्यान आरोग्य समिती सभापतीसाठी सेना-भाजपाच्या वतीने सायली रोशन जाधव तर आघाडीच्या वतीने अलका सदाशिव गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अलका सदाशिव गवळी यांनी माघार घेतल्यामुळे सायली रोशन जाधव यांची आरोग्य सभापती पदावर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!