Type to search

Breaking News जळगाव

चाळीसगाव : गिरणा नदीत तीन जणांचे मृतदेह

Share

चाळीसगाव । प्रतिनिधी

तालुक्यातील सायगाव ते पिलखोड जवळ गुरुवारी दुपारी तीन अनोखळी इसमांचे मृतदेह वाहून आले असून ते सायगाव जवळ नदीपात्रात अडकले. तर काही वेळाने पाण्याचा जोरदार प्रवाहात एक मृतदेह वाहून गेला.

नदीपात्रात अडकलेला व वाहून जाणारा मृतदेह पाहण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती.

गिरणा धरणात 100 टक्के पाणीसाठा झाल्याने गिरणा धरणातून पाण्याच्या विसर्गासाठी चार दरवाजे उघडण्यात आले असून पाणी सोडण्यात येत आहे.

सद्यस्थितीला गिरणा धरणातून 20 हजार क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. गुरुवारी दुपारी तालुक्यातील सायगाव ते पिलखोड दरम्यानच्या नदीपात्रात तीन अनोखळी इसमाचे मृतदेह ग्रामस्थांना अडकल्याचे दिसले.

त्यातील एक मृतदेह पाण्याच्या प्रवाहने गिरणानदीत पुढे वाहत गेला आहे. सायगाव पासून गिरणा धरण अंदाजे 15 किलोमिटर असून, या पट्ट्यात मार्दुणे, मन्याड, बोराळे आदी गाव येतात.

पोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!