Type to search

Featured जळगाव फिचर्स

कोरोनाच्या भीतीपोटी पुणे, मुंबईवरुन चाळीसगावात हजारो लोक दाखल

Share

चाळीसगाव  – 

चाळीसगाव हे चार जिल्ह्याच्या सिमेवरील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे येथून नोकरी व शिक्षणासाठी पुणे, मुंबई व इतर ठिकाणी स्थायीक झालेल्याची संख्या मोठ्या प्र्रमाणात आहेत.

पुणे व मुंबईत कोरोनाच्या प्रार्दुभाव वाढल्यामुळे भितीपोटी लोक चाळीसगावात दाखल होत आहेत. तर काही नातेवाईक मंडळी सुध्दा मोठ्या शहरातून चाळीसगावसह ग्रामीण भागात आले आहेत.

पुणे, मुंबईहुन चाळीसगावात दाखल झालेल्याची संख्या हाजारोंच्या घरात आहेत. परंतू याची कुठलीही नोंद न आरोग्य विभागाकडे आहे, ना प्रशासनाकडे, अशाची नोंद नसल्यामुळे चाळीसगावात कोरोना भयानक स्थितीबाबत उदासिनता दिसून येत आहे.

जळगाव, धुळे, नासिक, औरंगाबाद या चार जिल्ह्याच्या सिमेवर चाळीसगाव तालुका आहे.  चाळीसगाव येथे उद्योगाचे पुरेसे साधन नसल्याने बरेच लोक पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे शिक्षणासाठी, नोकरी व उद्योगासाठी गेलेले आहेत. त्यातील बरेच लोक मोठ्या शहरामध्येच आता कायमचे स्थायीक झाले आहेत.

कोरोनाच्या भितीने चाळीसगावात पुणे, मुंबई येथून आतापर्यंत हजारो लोक दाखल झाले आहेत.तर काही लोक विदेशातून सुध्दा जावून आलेले आहेत. विशेष म्हणजे शहरातील प्रत्येक कॉलनीत बाहेरगावाहुन आलेल्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बाहेरगावाहुन आलेले हे घरातच कैद झाले आहेत. परंतू प्रत्येक कॉलनीत बाहेर गावाहुन आलेल्यांविषयी प्रचंड भिती निर्माण झाली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!