Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

चाळीसगाव : डेंग्यूने महिलेचा मृत्यू : प्रचारामुळे नगरसेवकांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Share

पाटणादेवी रोड परिसरात अनेकांना डेग्यूची लागण

चाळीसगाव । प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या शहरात उमेदवारांच्या प्रचाराबाबत जनजागृती होतांना दिसत आहे. मते मागण्यासाठी लाचार झालेले उमेदवार कोट्यावधी रुपय खर्च करुन, आपल्याला जास्त मते कसे मिळतील यासाठी प्रचार आणि प्रसार करीत आहेत. काही नगरसेवकांना आर्थिक अटी-शर्तीच्या बोलीवर सहभागी केले आहे. त्यामुळे नगरसेवक हे आपल्या नेत्यांचा प्रामाणिक प्रचार करीत आहे. परंतू ज्या जनतेने त्यांना मते टाकून नगरसेवक केले, त्यांच्या आरोग्याकडे मात्र ते पद्धतशिरपणे दुर्लक्ष करीत आहे. शहराच्या आरोग्याचा प्रश्न गेल्या दोन महिन्यांपासून गंभीर झाला आहे. अस्वच्छतेमुळेच शहरातील पाटणादेवी रोड परिसरात राहणार्‍या एका 52 वर्षीय महिलेचा बुधावारी पहाटे डेग्यूची लागन झाल्याने, धुळे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

पाटणादेवी रस्त्यावरील सौ.अरुणाबाई सुनिल गुरव (52) या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आजारी होत्या. उपचारासाठी त्यांना चाळीसगाव येथील दोन खासगी रुग्णालयात दाखल केले असतांना, डॉक्टरांनी त्यांना डेंग्यूची लागन झाल्याचे सांगीतले. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे 6 वा. या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

पावसाळा संपला असला तरी शहरातील गटारीत साचलेली घाण, पाण्यामुळे उगवलेले गवत यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढले असून येथील पाटणादेवी रोडवरील आणि लागूनच असलेल्या बाराभाई मोहल्लासह चाळीसगाव परीसरातील अनेकजण आजारी असून शहरातील खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयात बहूतांश रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असल्याचा अहवाल असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत.

डेंग्यूची लागण झालेल्या बावन वर्षीय महिलेचा आज पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू पावल्याच्या घटनेने परीसरात डेंग्युबाबत भिती वाढली आहे. शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात डेंग्युचे रुग्ण आहेत. तर काही रुग्ण हे बाहेरगावी उपचार घेत आहेत.

त्यामुळे शहरात डेंग्युने डोके वर काढले आहे. परंतू निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारात व्यस्त असलेल्या काही नगरसेवकांना याबाबत काहीएक देणघेन नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. मागील सर्वसाधरण सभेत प्रभारी मुख्याधिकार्‍यांनी मला 15 दिवस द्या मी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावतो. परंतू त्यासाठी मला नगरसेवकांची साथ हवी असल्याचे भर सभागृहात सांगीतले होते. परंतू नगरसेवक विधानसभेच्या प्रचाराच्या महत्वाच्या कामात असल्यामुळे ज्या जनतेने त्यांना न.पा.च्या सभागृहात पाठविले आहेत. त्याच्याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळेच मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक वॉर्डात मते मागण्यासाठी विधानसभेचा उमेदवार व त्यांच्या बरोबर येणार्‍या त्या गरसेवकांना कुठले प्रश्न विचारायचे हे आता जनतेच ठरवायचे आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!