Friday, April 26, 2024
Homeजळगावचाळीसगाव : बळजबरीच्या प्रेमासाठी त्याने कापली हाताची नस…?

चाळीसगाव : बळजबरीच्या प्रेमासाठी त्याने कापली हाताची नस…?

चाळीसगाव | प्रतिनिधी 

चाळीसगाव शहरातील गायत्री कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमीयुगालाचा सुळसुळाट आहे, काही टवाळखोर गायत्री कॉम्प्लेक्समध्ये शाळकरी मुलींना बळजबरीने बोलावून प्रेमासाठी गळ घालत असल्याची चर्चा येथील व्यापार्‍यांमध्ये आहे. सोमवारी अशाच तीन टवाळखोर मुलांनी ‘ एका ’ शाळकरी मुलीला कॉम्प्लेक्समध्ये भेटण्यासाठी बोलवले, त्यातील एकान तिच्यावर प्रेमासाठी बळजबरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  परंतू मुलीने नकार दिल्याने, तिला घाबरवण्यासाठी त्याने चक्क आपल्या हाताची नस धारधार वस्तूने कापली, हातातून प्रचंड रक्त स्त्राव होवू लागल्याने, फर्चीवर रक्तांचा थारोले तुंबले, तसेच इतर लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच, ते सर्व तेथून पसार झाले. गायत्री कॉम्प्लेक्समध्ये नेहमीच टवाळखोर व प्रेमीयुगलाचा सुळसुळाट राहत असल्यामुळे येथील व्यापार्‍यांना त्रास सहन कराव लागतो. त्यामुळे पोलिसांनी आशा प्रेमीयुगलाचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा एखादा मोठा अनुचित प्रकार येथे घडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गायत्री कॉम्प्लेक्स येथील जळगाव जनता बॅकेच्या पाठीमागील बाजूच्या जिन्यामध्ये सोमवारी ‘ एक ’ शाळकरी मुलीला तीन टवाळखोर मुलानी भेटण्यास बोलले होते. त्यातील एक मुलाचे व शाळकरी मुलगी दोघांमध्ये गप्पा चालू असताना, अचानक त्या मुलाने आपल्या हातातील धारधारवस्तूने हाताची नस कापून घेतली. बहुतेक तो त्या मुलीला प्रेमासाठी बळजबरी करत असावा ?  परंतू मुलीने नकार देताच त्याने आपल्या हाताची नस, तिला घाबवण्यासाठी कापून घेतली आणि मुलीचा मनात त्यांच्याविषयी सहानुभूती वजा दहशत निर्माण केली. घडलेला प्रकार कॉम्प्लेक्समधील आजु-बाजूच्या व्यापार्‍यांच्या व उपस्थितांच्या लक्षात येताच, सर्वांनी तेथून पळ काढला. मुलाने हाताची नस कापल्याने, जळगाव बॅकेच्या शेजारी असलेल्या गॅलेरीत रक्त पडलेले होते. प्राप्त माहितीनूसार या तरुणाने नतंर शहरातील ग्रामीण रुग्णालयात जाऊन, स्वता;वर उपचार करुन घेतले. परंतू त्याठिकाणी देखील त्याने चुकीचे नाव सांगीतल्याची शक्यता आहे. कारण माझा हाताला काच लागल्यामुळे मी उपचारासाठी आलो असल्याचे तेथील वॉर्डबॉयला त्याने सांगीतल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्यासोबत जे दोन तरुण होते, त्यांनी तो तालुक्यातील पातोंडा येथील असून आम्हाला त्यांचे नाव माहिती नसल्याचे सांगीतले. तिघे जण ग्रामीण रुग्णालयात बिधास्तपणे गप्पा मारत होते. त्याच्यात हाशी-मज्जाक देखील सुरु होती. यावरुन त्या मुलाने बळजबरीच्या प्रेमासाठी, त्या शाळकरी मुलीला घाबरविण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सद्या समाजात आशा अनेक घटना घडत असून त्यातीलच ही एक आहे. अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमाच्या झाळ्यात ओढण्यासाठी टवाळखोर तरुण असले प्रयोग करतात, आणि एकदाका मुलगी आशा प्रकारांमुळे त्यांच्या जाळ्यात फसली की तिचे आयुष्य उद्धवस्त करतात. त्यामुळे पालकांनी देखील आपल्या पाल्याची काळजी घेणे जरुरी आहे.

गायत्री कॉम्प्लेक्स शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व बसस्थानकाजवळ आहे. कॉम्प्लेक्सच्या आजुबाजूच्या परिसरात शाळा, कॉलेज व महाविद्यालय आहेत. त्यामुळे पहाटे येथे शाळकरी मुली व टवाळखोर मुले बोलतांना बर्‍याचदा आढळुन येतात. कॉम्प्लेक्सच्या ‘ दोन्ही ’ जिन्यांमध्ये हा प्रकार सर्रास चालतो, बर्‍याचदा आश्‍लिल चाळे करताना देखील प्रेमीयुगल याठिकाणी अनेकाना दिसले आहेत. व्यापार्‍यांनी किवा नागरिकांनी आशा हाटकले, तर उलटे त्यांनाच दबबाजी या टवाळखोर मुलांकडून केली जाते. त्यामुळे व्यापारी सुध्दा भितीपोटी आता ह्या टवाळखोर मुलांना हटकण्याचे धाडस करीत नाही. तसेच पोलिसांचे देखील या गंभीर प्रकारकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आशा टवाळखोर व प्रेमीयुगालाची हिम्मत वाढली असून गायत्री कॉम्प्लेक्स म्हणजे बोलण्यासाठी व भेटण्यासाठी हक्काची जागा असल्याचे त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे आश्‍लील चाळे करण्यापासून ते मुलीला बळजबरीने प्रेम करण्यासाठी हाताची नसे कापे पर्यंतचे प्रकार याठिकाणी घडू लागले आहेत. पोलीसांचा शहरात धाक नसल्यामुळेच आशे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनीची निर्भया पथकांची नव्या स्थापनाकरुन गायत्री कॉम्प्लेक्ससह शहरातील इतर कॉम्प्लेक्सवर बिधास्तपणे वावरणारर्‍या प्रेमीयुगालासह टवाळखोरांवर कारवाईची गरज आहे. तसेच पालकांनी देखील आपला पाल्य हा कुठे जातो, याकडे बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे, नाहीतर भविष्यात त्यांच्यावर पश्‍चाताप करण्याची वेळ नक्कीच येणार असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

प्रतिक्रिया-

गायत्री कॉम्प्लेक्समध्ये नेहमीच अल्पवयीन मुली व मुले बोलतांना दिसतात, अनेकदा आशा हाटकून देखील काही एक उपयोग होत नाही. यासंबंधीत पोलिसांना देखील कळवले होते, परंतू तातपूर्ती कारवाई झाली. व्यापाराना नेहमीच येथे येणार्‍या प्रेमीयुगल व टवाळखोरांचा त्रास सहन कराव लागतो. पोलिसांनी नेहमीच याठिकाणी गस्त घालून प्रेमीयुगलाचा बंदोबस्त कराव हिच अपेक्षा आहे.

  वर्धमान धाडीवाल, व्यापारी

——————————–

प्रतिक्रिया- 

गायत्री कॉम्प्लेक्सच्या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये नेहमीच प्रेमीयुगलाचा वावर दिसून येतो. अनेकदा आम्ही त्यांना हटकले तरी देखील पुन्हा पुन्हा याठिकाणी मुले-मुली जिन्यात बोलतांना दिसून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे असाच प्रकार सुरु आहे. पोलिसांनी आशा प्रेमीयुगालाचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरित पथकाची नेमणूक करावी.

मनोज माने, करसल्लागार

——————————–

- Advertisment -

ताज्या बातम्या