चाळीसगाव तालुक्यावासियांसाठी धोक्यांची घंटा

चाळीसगाव तालुक्यावासियांसाठी धोक्यांची घंटा
सायंगाव : एक जण कोरोना पॉझिटिव्ह, उर्वरित १९ निगेटिव्ह

चाळीसगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील सायंगाव येथील एक जण नांदगाव तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यांच्या संपर्कातील आलेले २० जणांचे स्वॅब तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यातील बोरकुंड (ता. धुळे एक) जण कोरोना बाधित झाला,  तर उर्वरित १९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे. पुन्हा कोरोना बांधित रुग्ण आढळल्यामुळे तालुक्यावासियांसाठी ही धोक्याच घंटा आहे.

सायंगाव येथील एकचा (दि,२४) अहवाल नांदगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान संशयित आरोपी असलेला हा रुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नजरेतून लपत फिरत होता. तो धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून आपल्या घरी सायंगाव येथे येवून गेला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्या परिवारीतील पत्नी, तीन मुले, वडील, व त्यांच्या संपर्कात आलेल्या १९ जण व बोरकुंड ता. धुळे, एक जण अशा २० जणाना चाळीसगाव येथील कोव्हीड केअर सेंन्टरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.  मंगळवार दि. २६ रोजी क्वारंटाईन असलेल्या २० जणांच्या स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात होते.  या सर्वांचे तपासणी अहवाल   आज रविवार प्राप्त झाले, त्यापैकी धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील एक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी दिली. आता शहरातील शनिवारी स्वॅब पाठविण्यात आलेल्या सहा जणांच्या अहवालाची प्रतिक्षा असून तालुकावासियांची धाकधुक वाढली आहे.
तालुक्यावासियांसाठी धोक्याच घंटा-
शहरासह तालुक्यातील जामडी, सायंगाव, डोण, टाकळी प्र.चा आदि परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात पुन्हा सायगाव येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सायगाव येथेच सापडलेल्या बोरकुंड ता.धुळे येथील एकास  कोरोनाची बांधा झाल्याने, तालुक्यावासियांसाठी ही धोक्यांची घंटा आहे. तालुक्यात आता एकूण ९ अधिक १ कोरोनाचे रुग्ण आढळुन आल्याने,  चाळीसगावकारांनी आता तरी घरात राहुनच सुरक्षिता बाळगावी नाहीतर, पच्छाताप करण्याशिवाय पर्यार राहणार नाही.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com