Friday, April 26, 2024
Homeजळगावचाळीसगाव : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत

चाळीसगाव : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत

प्रशासनाकडून पाहणी, ५०० मीटर परिसर सील
संपर्कात आलेल्या शोध सुरु
आज पाच ते सात स्वॅब पाठविण्याची शक्यता ?

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून एक पोलीस कर्मचार्‍यांला कोरोनाची बांधा झाल्याचे शनिवारी रात्री आलेल्या अहलवात निष्पन्न झाले. पोलीस कर्मचारी कोरोना बांधित निघाल्यामुळे, तालुक्यातील पोलीससह वैद्यकिय यंत्रणा हादरली आहे. रविवारी प्रशासनाच्या पथकाने टाकळी प्र.चा मधील प्रभाग क्र.५ मधील कोरोना बांधित पोलीस कर्मचार्‍याच्या घराच्या आजुबाजूच्या परिसराची पाहणी केली. तसेच तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती तहसीदार आमोल मोरे व डॉ.डी.डी.लांडे यांनी दिली आहे. पोलीस कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम वैद्यकिय व पोलीस प्रशासनाकडून सुरु झाले. संपर्कात आलेल्या तब्बल सहा ते सात जणांचे स्वॅब घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तत्पूर्वी संकाळी संपूर्ण परिसरात जणतूनाशक फवारणी करण्यात आली. कोरोना बांधिताच्या घराच्या परिसराची पाहणी करण्यासाठी तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्यासह तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.डी.लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, टाकळीचे सरपंच, ग्रा.प.सदस्य आदि उपस्थित होते. तो पोलीस कर्मचारी तालुक्यातील ‘ जामडी ’ चेक पोस्टवर कार्यरत होता. आणि तेथूनच तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. तालुक्यात जरी कोरोना शिरकाव केला असला तरी देखील अजुनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी आजपासूनच आपली व दुसर्‍यांच्या सुरक्षितेसाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
कंटेन्मेंट झोन म्हणजे काय?
ज्या घरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे, त्या घराला एपिसेंटर (किंवा मध्यवर्ती) मानून त्याच्या आसपासचा साधारणत: ५०० मीटरचा परिसर सील केला जातो. यालाच कंटेनमेंट झोन म्हटलं जातं. टाकळी प्र.चा. मधील प्रभाग ५ हा आता कंटेन्मेंट झोन केल्याने, कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील आत आणि बाहेर येण्याचे रस्ते पूर्णत सील करण्यात आले आहेत. ५०० मीटरच्या परिसरात आता पूर्णता; बंद करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या