Type to search

maharashtra जळगाव फिचर्स

नोकरीच्या अर्जात लखपती भिकारी म्हणतो, गाडगेबाबा, गांधींचे स्वच्छतेचे काम मी करतो !

Share

चाळीसगाव

‘मी संत गाडगेबाबा व महात्मा गांधी स्वच्छता अभियानांतर्गत रेल्वेगाडीत स्वच्छतेचे काम करतो. मला रेल्वेत कायमस्वरुपी नोकरी द्यावी,’ असे अर्ज लखपती भिकार्‍याने माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, तत्कालीन रेल्वेमंत्र्यांना केले होते. रेल्वेत झाडू मारुन भीक मागणारे इंदरसिंग ठाकुर यांचे सोमवारी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या सामानाच्या तपासणीत असे अनेक आश्चर्यकारक प्रकार उजडेत आलेत. त्यांच्याकडील पैशांमध्ये नेपाळ, सौदी अरेबियातील विदेशी चलनाचाही समावेश आहे. आता त्यांच्या रकमेवर दावा करण्यासाठी पाच जण वारस म्हणून पुढे आले असून यात आई, भाऊ व चार बहिणींचा समावेश आहे

.

चाळीसगाव येथील मध्यवर्ती ठिकाणी नारायणवाडी परिसरात राहणारे इंदरसिंग फुलचंद ठाकुर (52) रेल्वेत झाडूने साफसफाई करुन प्रवाशांजवळ भीक मागून उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा आजारपणामुळे धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या जवळील सामानाची तपासणी केली असता, त्यात भारतीय स्टेट बँकेचे पासबुक आढळून आले. यात त्यांच्या बँक खात्यावर 5 लाख 47 हजार रुपये रोख व दोन वेगवेगळ्या फिक्स डिपॉझिट असे एकूण 12 लाख रुपये होते. पोलिसांनी त्यांच्या सामानाची तपासणी केली असता, त्यात भारतीय चलनाच्या एक, दोन, पाच रुपयांच्या नोटांसह विदेशी चलनही सापडले. त्यात नेपाळ, सौदी अरेबिया व इतर देशांतील चलनाचा समावेश आहे. त्यामुळे इंदरसिंग ठाकुर भिकारी लखपतीच नव्हे तर चतुरही असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ठाकुर यांच्या खोलीत आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डसह जवळपास सर्व शासकीय कागदपत्रे आढळून आली.

नोकरीसाठी मनमोहन सिंग, रेल्वेमंत्र्यांकडे अर्ज

मयत इंदरसिंग फुलचंद ठाकुर यांनी आयुष्यभर रेल्वेत झाडू मारला आणि प्रवासी देतील ते दान आनंदाने घेऊन आपला उदरनिर्वाह चालवला. त्यांचे तिसरीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांनी रेल्वेत कायमची नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, पीयूष गोयल यांच्यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, मी गेल्या 22 वर्षांपासून भुसावळ ते इगतपुरी रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वेगाडीमध्ये झाडू मारण्याचे काम करीत आहे, आता माझे वय 42 वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. मी संत गाडगेबाबा व महात्मा गांधी स्वच्छता अभियानांतर्गत रेल्वेगाडीत स्वच्छतेचे काम करतो. तसेच ‘गाणी’ म्हणून लोकांचे मनोरंजन करतो. लोक देतील ते पैसे घेऊन उदरनिर्वाह करतो. त्यामुळे मला रेल्वेत कायमस्वरुपाची नोकरी मिळावी.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!