Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव पोलिसांवर हल्ला

चाळीसगाव पोलिसांवर हल्ला

चाळीसगाव –

तालुक्यातील बिलाखेड येथे संचारबंदीचे उल्लघन करुन, अवैद्यरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर आज चाळीसगाव पोलिसांनाचे पथकाने छापा टाकुन 11.500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.

- Advertisement -

परंतू आरोपी संधी फायदा घेवून पळून गेला. त्यांचा पाठलाग करत, त्याला पकडण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला आरोपींनी चक्क शिवीगाळ करुन, धक्का-बुक्की केल्याचा धकादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला चारांवर गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील बिलाखेड येथेे संचारबंदीच्या काळात गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विजय कुमार ठाकुर वाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मयुर भामरे, पोहेकॉ.पंढरीनाथ पवार, विनोद भोई, भटू पाटील, राहुल गुंजाळ, पोकॉ.वंदना राठोड आशाच्या पथकाने बिलाखेड येथील शेतातच्या बांधावर सुरु असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टीवर छापा टाकला असता. त्याठिकाणी 11500 रुपयांची गावठी दारुसह दारु बनविण्याचे कच्चे पक्के रसायन पोलिसांना मिळुन आले.

तसेच दारु पाडणारा पंडीत पुंजू सोनवणे देखील त्या ठिकाणी होता. परंतू पोलिसांना पाहताच तो तेथून संधीचा फायदा घेवून पसार झाला. पोलिसांना मिळुन आलेले 11500 रुपयांची दारुसह मुद्देमाल त्यांनी जागेवरच नष्ट केला. तसेच पळून गेलाला संशयित आरोपी पंडीत पुंजू सोनवणे यास पकडण्यास पोलिसांचे पथक बिलाखेड गावी त्यांच्या घरी गेले असता, त्यांचा मुलगा प्रकाश ऊर्फ भुर्‍या पंडीत सोनवणे, प्रदीप पडींत सोनवणे, प्रमीलाबाई पंडीत सोनवणे आशानी पोलीस पथकाशी वाद घालण्या सुरुवात केली. तसेच एका पोलीस कर्मचार्‍यांची कॉलर पकडून शिवीगाळ करुन धक्का-बुक्की केली.

आरोपी पंडीत सोनवणे याने पोलिसांशी हुज्जत घालत तुम्ही माझे काहीच करुन घेणार नाहीत, माझावर भरपूर गुन्हे दाखल आहेत. मी देखील तुम्हाला केस मध्ये आडकवून टाकले असा दम भरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेे.

यात सरकारी कामात अडथळ आनला म्हणून पोहेकॉ.भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरुन पंडीत सोनवणे, प्रकाश सोनवणे, प्रदीप सोनवणे, प्रमीलाबाई सोनवणे यांच्या विरोधात भादवी कलम 353,332,427,504,506,186 प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या