Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव : करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील 20 जण क्वॉरंटाइन

चाळीसगाव : करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील 20 जण क्वॉरंटाइन

स्वॅब धुळे येथे तपासणीसाठी रवाना, दोन दिवसात अहवाल येण्याची शक्यता

चाळीसगाव  – 

- Advertisement -

चाळीसगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणारा अमोदे,ता.नांदगाव येथील 55 वर्षीय पुरुष नाशिक येथे कोरोना पॉझिटिव निघाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आज मंगळवारी कोरोना बांधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन डॉक्टारांसह 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच सर्वांचे सॅब घेवून ते धुळे येथे तपासणी पाठविण्यात आले असून दोन दिवसात ते अहवाल येण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.

शहरातील करगावरोडस्थित हॉस्पिटल येथे आमोदे ता.नांदगाव, नाशिक येथील 55 वर्षीय पुरुष उपचारासाठी दाखल होऊन गेला असून त्याला नाशिक येथे तपासणीत कोरोना झाल्याचे निषन्न झाले.

यामुळे तालुक्यातील वैद्यकिय यंत्रणा हादरली आहे. मंगळवारी हॉस्पिटल मधील एक डॉक्टर, 10 रुग्ण, रुग्णालयातील 10 जणांचा स्टॉप व दोन लॅब मधील कर्मचारी, अशा तब्बल 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले.

या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले असून सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दोन दिवसात तपासणीचे अहवाल आल्यानतंर वैद्यकिय आधिकारी व प्रशासन पुढील निर्णय घेणार आहेत. या पैकी काहीचे रिर्पाट पॉझिटिव्ह आलेत, तर संपूर्ण एक मिटरचा परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता तपासणी अहवालावर सर्वांचा नजरा लागलेल्या आहेत.

आमोदे गावात प्रशासानतर्फे कडक बंदोबस्त

चाळीसगाव येथे उपचार घेतलेला 55 आमोदे ता.नांदगाव येथील रुग्ण कोरोना पॉ झिटिव्ह आढळल्याने आमोदे गावात पोलिस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त लावण्यात आला. तसेच आमोदे गावात नांदगाव येथील तहसीलदार, उपविभीगीय आधिकारी, वैद्किय आधिकारी हे दाखल होवून, त्यांनी संबंधी रुग्णाची माहिती जानून घेतली. तसेच त्यांच्या घराच्या आजुबाजूचा परिसर सिल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कोरोना बांधित रुग्णाच्या घरातील 10 ते 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णाचे किराणा दुकान व पिठाची चक्की असल्याचे बालेले जात असून तो मालेगाव येथे किराणा दुकानाचा माल घेण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी गेल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या