Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली

Share

इंदिरानगर | वार्ताहर

सकाळी घरासमोर खुर्चीवर बसलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना दि(18) मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलावती राज कपूर सिंह वय (66 )रा आनंद नगर पाथर्डी फाटा ह्या वृद्ध महिला आपल्या घराच्या समोर पोर्चमध्ये सकाळी 7 वाजेच्या सुमारास खुर्ची टाकून बसल्या होत्या.

त्याचवेळी काळ्या रंगाच्या दुचाकी स्वार अनोळखी तरुणाने त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे 70 हजार रुपये किमतीची सोनसाखळी बळजबरी हिसकावून घेतली यावेळी त्यांनी आरडाओरड केला.

मात्र, लोक त्यांच्या मदतीला येईपर्यंत धूम स्टाईलने चोरटा तेथून पसार झाला होता. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ मोरे अधिक तपास करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!