इंदिरानगर परिसरात सोनसाखळी ओरबाडली
Share

इंदिरानगर | वार्ताहर
रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचे वीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरी ओढून नेल्याची घटना काल (दि,०७) रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीती आळंद (वय ४३) रा पो,ओजस अवेन्यू रविशंकर मार्ग ह्या फुले खरेदी करण्यासाठी दि (७) सोमवार रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या सासू बरोबर रथ चक्र चौक येथे फुल घेण्यासाठी गेल्या होत्या फुले खरेदी करून घराकडे जाताना बजरंग कॉलनी जवळ काळ्या रंगाच्या दुचाकी स्वार अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे २०हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरी ओरबाडून धूम स्टाईलने साईनाथ नगर चौफुली कडे पसार झाले.
याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राँकेश भामरे अधिक तपास करत आहेत.