राष्ट्रपतीपदाच्या मतदानासाठी भुजबळ, कदम तासाभरासाठी तुरूंगातून सुटणार

0

मुंबई, ता. १७ : तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम तासाभरासाठी सुटणार आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विधानभवन येथे आमदारांचे मतदान होत आहे.

विशेष म्हणजे तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही आज मतदान करतील.

भुजबळ आणि रमेश कदम यांना पोलिस संरक्षणात विधानसभेत मतदानासाठी नेण्यात येईल. तिथे मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा तुरूंगात नेण्यात येईल.

दरम्यान आज आ. अजित पवार, एकनाथ खडसे, विनोद तावडेंनी, मतदानाचा हक्क बजावला.

LEAVE A REPLY

*