अवघ्या वर्षभरात सीईंओ बिनवडे यांची बदली

0
अकोल्याचे मुख्य कार्यकारी
माने यांना नगरला संधी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अवघ्या वर्षभरापूर्वी नगरला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदलून आलेले रवींद्र बिनवडे यांची नाशिक विभागात नंदूरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.व्ही. माने यांची बदली करण्यात आले असल्याचे आदेश बुधवारी राज्य सरकारने काढले आहेत.
मुळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी असणारे बिनवडे यांनी महसूल खात्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी पदापासून आपल्या सेवेला सुरूवात केली होती. गेल्यावर्षी त्यांना नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर दुसरीच पोींग मिळाली होती. या पदावर काम करतांना बिनवडे यांनी जिल्हा परिषदेत कामाचा कोणताही अनुभव नसतांना आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
त्यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील 48 विद्यार्थ्यांना इस्त्रोवारीचे दर्शन घडले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जूनला परदेशातील नगरकरांशी संवाद साधण्याच्या उपक्रमाची घोषणा केली होती. बुधवारी दुपारी राज्य सरकारकडून त्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता.
पारदर्शक आणि विना राजकीय हस्तक्षेप असा बिनवडे यांचा कारभार होता. त्यांच्या काळात प्राथमिक शिक्षकांचे रखडलेले रोर पूर्ण झाले होते. अवघ्या वर्षभरात झालेल्या बदलीला ते आव्हान देता की बदलीच्या ठिकाणी जातात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे आणि मुळचे सांगली जिल्ह्यातील माने हे सध्या अकोला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत होते. त्यांची नगरला बदली झाली असून नगर जिल्हा परिषदेचा राज्यात नावलौकीक असून या ठिकाणी काम करणे अधिकार्‍यांना आव्हानात्मक असल्याने ते कशा पध्दतीने या ठिकाणी काम करणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

*