पंजाब मेलचे इंजिन बंद पडले; म.रे. पुन्हा विस्कळीत

0
इगतपुरी (वाल्मिक गवांदे)l नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील ऊंबरमाळी जवळ मुंबईकडे जाणारी पंजाब मेलचे इंजिन अचानक बंद पडल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ऐन सकाळी गर्दीच्या वेळेस कसारा उंबरमाळी दरम्यान पंजाब मेलचे इंजिन बंद पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे.

सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या  घटनेमुळे मध्यरेल्वेची वाहतूक सुमारे दीड ते दोन तास विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे लोकलने मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच हाल झाली.

कसारा-उंबरमाळी दरम्यान पंजाब मेलचे इंजिन बंद पडल्याने एर्नाकुलम एक्सप्रेस, भुसावळ पुणे एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस या मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेसही एक ते दीड तास उशिराने धावत असल्याने काही गाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकात काही काळ थांबवण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

*