Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमन थोड्याच वेळात मांडणार केंद्रीय अर्थसंकल्प; संपूर्ण देशाचे लक्ष

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी अकरा वाजता सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणास प्रारंभ करणार आहेत. त्यापूर्वी सीतारमण यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेत अनेक घोषणांचा पाउस यावेळी पाडण्यात आला होतता.

आज अर्थमंत्री सिंतारमन यांच्याकडे सर्वांचे लक्ष असून अर्थसंकल्पात दडलय तरी काय याबाबत उत्सुकता लागून आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर ४० टक्क्यांपर्यंत कर लागू शकतो.

त्याशिवाय नोकरदार वर्गासाठी आयकर उत्पन्नाच्या कर रचनेत बदल करण्यात येऊ शकतो. २०१९-२० च्या अंतरिम अर्थसंकल्प पाच लाखांच्या उत्पन्नावर सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

सध्या २.५ लाख ते ५ लाख उत्पन्नावर ५ टक्के, ५ ते १० लाखाच्या उत्पन्नावर २० टक्के आणि १० लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर ३० टक्के कर आहे.

व्यापाऱ्यांसाठी १० लाखांचा अपघात विमा, किसान क्रेडिट कार्डसारखी व्यापारी क्रेडिट कार्डचे आश्वासन भाजपने दिले होते. त्याशिवाय सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना २५ टक्के कर लावण्याबाबत मागणी करण्यात येत होती. पाणी योजनांचा प्रभावी निर्णय या अर्थसंकल्पात होऊ शकतो अशी शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!