Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

केंद्र सरकारची नजर आता पाकव्याप्त काश्मीरवर; जावडेकरांचे सूचक विधान

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकारची नजर आता पाकव्याप्त काश्मीरवर आहे असे सूचक विधान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीती आहे.

त्यामुळेच पाकने व्यापारी, राजकीय संबंध तोडले आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला जोडणं आमचं काम असल्याचे जावडेकर म्हणाले.

इंदोर येथील भाजपा कार्यालयात जावडेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू काश्मीर राज्याचा भाग असल्याने सध्या त्याठिकाणच्या विधानसभेच्या जागा रिक्त ठेवण्यात येतील. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारची नजर पाकव्याप्त काश्मीरवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!