Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सेंट्रल बँकेचा अजब कारभार; वीजपुरवठा खंडीत केल्याची सूचना लावत ग्राहकांना धरले वेठीस

Share

मनमाड | प्रतिनिधी

मनमाड शहरातील सेंट्रल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा अजब कारभार वीज पुरवठा खंडित असल्याचे कारण पुढे करत आज दिवसभर कामकाज बंद ठेवून हजारो खातेदारांना वेठीस धरण्यात आले.

बँकेच्या मनमानी कारभारामुळे खातेदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इन्व्हेंटर अथवा जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्याअवैजी थेट कामकाज बंद ठेवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न खातेदारांना पडला आहे.

अचानकपणे बँकेचे कारभार बंद ठेवता ययेत नाही हा प्रकार गंभीर असून मनमानी कारभार करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावीअशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,शिवसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष बळीद यांनी केली.

याबाबत अधिक वृत्त असे की,  वीज वितरण कंपनीतर्फे सध्या शहरातील जुनाट वायरी व विजेचे खांब बदलण्यात येत आहे त्यासाठी आळीपाळी ने रोज अर्ध्या शहरातील वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

मात्र,  सोमवारी शिवाजी चौकाजवळ जुनाट झालेले विजेचे एक खांब अचानक कोसळले त्यामुळे त्याच्यावर असलेल्या विद्युत ताराही तुटल्या त्याची दुरुस्ती करण्या करिता वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटर अथवा इन्व्हेटरची व्यवस्था करण्या ऐवजी सेन्ट्रल बैंक व बैंक ऑफ महाराष्ट्र यांनी चक्क बँकेचे कामकाज बंद ठेवले.

या दोन्ही बँकेचे हजारो खातेदार असून त्यात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील खातेदारांचा समावेश आहे. त्यामुळे रोज कोट्यावधी रुपयांची उलढाल होते. शिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे खाते या बँका मध्ये असून शेकडो व्यापारीही रोज व्यवहार करतात असे असताना देखील त्यांची कोणत्याही प्रकारची काळजी न घेता आणि त्यांना किती त्रास व गैरसोय होईल याचा तसूभर विचार न करता थेट बँकेचे कामकाज बंद ठेवण्यात आले.

जेंव्हा खातेदार बँकेत आले तेंव्हा गेटवर बँक बंद असल्याचा बोर्ड पाहून त्यांना आश्चर्य वाटले. काहींनी बँक का बंद आहे याची विचारणा केली.

असता त्यांना समाधान कारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे घरी परत जाण्याची वेळ  ग्रामीण भागातील खातेदारावर आली.वीज पुरवठा खंडित झाला म्हणून दिवसभर बँकेचे कामकाज बंद ठेवता येते का? असा प्रश्न खातेदारांना पडला आहे.

दरम्यान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष बळीद, माजी नगराध्यक्ष अरुण ताठे हे बँकेत कामानिमित्त गेले होते. तेथे त्यांना सर्व प्रकार कळला व त्यांनी या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत संपर्क करून खातेदारांना वेठीस धरणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबरच बँकेचे कामकाज नियमाप्रमाणे रोज करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!