Video : दाजीबा वीराची मिरवणूक उत्साहात सुरु; दर्शनासाठी नाशिककरांची मोठी गर्दी

0
जूने नाशिक | डोक्याला फेटा त्यावर खंडेराव महाराजांचा मुखोटा, डोळ्यावर मंडोळी, कानात सोन्यांच्या पगड्या, गळ्यात सरी, हातात सोन्याचा कड, पायात मारवाडी जोडा, कंबरेला धोतर अशा भव्य रुपांत नवसाला पावणार्‍या दाजीबा वीराची मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली. आरती करून मिरवणुकीला जुन्या नाशकातून प्रारंभ झाला.

जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून मिरवणुकीला सुरुवातd झाली. मिरवणुकीदरम्यान ठीक ठिकाणी महिला औन्क्षण करत आहेत. मिरवणूक मार्गावर रांगोळी, पाठ, फुले टाकून रस्ते सजविण्यात आले आहेत.

मिरवणुकीदरम्यान, दाजीबा वीराचे पाय स्वच्छ पाणी टाकून धुतले जात असून ठिकठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी झाली आहे. गल्लीत भाविकांवर पाण्याचा वर्षाव करत मिरवणूक रंगात आली आहे. याप्रसंगी
खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली….नवरी नटली अग बाई सुपारी फुटली च्या तालावर नाशिककर थिरकले आहेत.

मिरवणूक पुढे बुधवार पेठ, चव्हाटा, संभाजी चौक, तांबट लेन मार्गे फावड़े लेन, रविवार कारंजा येथून पुढे रामकुंड येथे येणार आहे.

मिरवणुकीची माहिती :  धूलिवंदनाच्या दिवशी पूर्वजांची आठवण म्हणून घरातील देवघरात ठेवलेले पूर्वजांचे टाकांना रामकुंडातील पाण्यात स्नान घालून पूजा केली जाते. यासाठी घरातील लहान मुले ही देव, देवतांचे किंवा महापुरुषाची वेषभूषा धारण करतात. यात पूर्वजांना ‘वीर’ संबोधले जाते. त्यामुळे या मिरवणुकीला वीर मिरवणूक म्हणतात. यात दाजीबा वीराला इच्छा पूर्ण करणारा वीर असल्याने त्यांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात.

मिरवणुकीचे महत्त्व : होळीच्या दिवशी रात्री 12 वाजता रामकुंडावर स्नान करून दिंडोरी तांलुक्यातील जानोरी गावातील खंडेराव मंदिरात आजही पूजा केली जाते. जुन्या नाशिकच्या बुधवार पेठेतून निघालेली मिरवणूक मधली होळी, गुलालवाडी, मेनरोड, रविवार कारजा मार्गी रामकुंडावर येते. धूलिवंदनला निघालेली मिरवणूक रात्री उशीरापर्यंत सुरू असते.

व्हिडीओ आणि फोटो : सतीश देवगिरे, विक्रम भास्कर

LEAVE A REPLY

*