जिल्ह्यात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पूण्यतिथी साजरी

0

कोतूळ (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील कोतुळ येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
येथील कोतूळ ग्रामपंचायत कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले. कोतूळ प्रेस क्लबचे अध्यक्ष सुनील गीते, गुलाब खरात, संजय देशमुख, जगन साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने, तळेगावचे माजी सरपंच सावळेराम वेडे, कोतुळ सोसायटीचे माजी चेअरमन रावजी धराडे , सचिव दादाभाऊ साबळे, इम्रान शेख, रघुनाथ जाधव, सखाराम लेंभे, पद्माकर महाजन, संतोष पवार, जालिंदर वाकचौरे आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कोतुळ सोसायटीचे संचालक निवृत्ती लोखंडे यांनी आभार मानले.

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- येथील वस्ताद ग्रुपच्यावतीने लोकशाहीर आन्नाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कथासंग्रह हे वास्तवदर्शी असल्याने समाजात त्यांच्या साहित्याने मोठे प्रबोधन केले म्हणूनच त्यांचे साहित्य आज समाजाला दिशा देणारे ठरत असल्याचे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या सभापती सौ.सुनिताताई गडाख यांनी केले.
नेवासा येथील नगर पंचायत चौकामध्ये जयंती समारंभात सौ.गडाख अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. नगराध्यक्षा सौ. संगीताताई बर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,श्रीमती सुशीलाबाई गायकवाड, माजी सरपंच शिवाजीराव टेकावडे, काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखदान, नगरसेवक रणजीत सोनवणे, लक्ष्मण जगताप, संदीप बेहळे, सतीश पिंपळे, भारत डोकडे, राजेंद्र मापारी, अ‍ॅड. बापूसाहेब गायके, सचिन वडागळे, रम्हू पठाण, प्रकाश सोनटक्के, बापू जामदार, भास्करराव कणगरे, शांताराम गायके, निलेश जगताप, सौ. गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक वस्ताद ग्रुपचे अध्यक्ष विकास चव्हाण यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जीवनकार्य प्रास्ताविकात व्यक्त केले. यावेळी सौ. गडाख यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सौ.गडाख म्हणाल्या, अण्णाभाऊ साठे यांनी लिहलेले साहित्य हे अनुभवातुन होते म्हणूनच त्यांच्या साहित्याचा प्रभाव समाजावर पडला. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन युवकांनी व सामाजिक संघटनांनी पुढे येऊन तळागाळातील उपेक्षितांसाठी लोकशिक्षण चळवळ उभारावी.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणून पंचायत समितीच्यावतीने ठराव केला जाईल असे जाहीर केले.
यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, आर्या आड़सुळ यांनी लोकशाहूर आन्नाभाऊ साठेंचे कार्य विषद केले. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक विकास चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रुपचे सदस्य डॉ.राहुल चव्हाण, कैलास चव्हाण, किरण चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, ज्ञानेश्‍वर चव्हाण, शुभम चव्हाण, संदीप चव्हाण, अंतुल चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

अण्णाभाऊंना भारतरत्न द्या अण्णाभाऊंना भारतरत्न द्या  यावेळी संजय सुखदान यांनी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजाला जागृत करणारे आहे. त्यांच्या कार्याची दखल सरकारने घेतली नसून त्यांच्या कार्याचा खरा सन्मान होण्यासाठी त्यांचा मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मान करावा. त्यासाठी गावपातळीवर ठराव घ्यावेत अशी मागणी केली.

सलाबतपूर (वार्ताहर)- येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संजयुक्तपणे साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक संदीप खाटीक यांनी केले. मिनाक्षी मुंगसे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीमती शारदा गोरे, लक्ष्मण मुंगसे, शुभांगी काळे, आरती जैन, अंकीता सातपुते आदी उपस्थित होते.

चांदा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील चांदा येथील शेतकरी तक्रार निवारण केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून ग्रामविकास अधिकारी बी. एस. महाजन उपस्थित होते.
सुरुवातीला अणाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधीवत पुजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना दहातोडे यांनी साठे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.
प्रास्ताविक शामराव पवार यांनी केले यावेळी विराट सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिष थोरात प्रविण बोरूडे किरण जावळे शाम पवार किरण थोरात, वृषभ थोरात, विजयकुमार थोरात, सागर थोरात, विजय शिंदे, ज्ञानेश्‍वर थोरात, रवी थोरात, कृष्णा थोरात, जिजाबापू थोरात, पप्पू गवळी, शहाजी धुमाळ, सुभाष शिंदे, राहूल थोरात, भाऊराव थोरात, आदिनाथ थोरात आदी उपस्थित होते.

कोेपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणीसाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पडत आल्या असून याबाबत आवश्यकता भासल्यास मंत्रालय स्तरावर देखील पाठपुरावा करून सहा महिन्यांत पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त शहरात अभिवादन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, रिपाइं उत्तर नगर जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, राजेंद्र बागुल, लक्ष्मण साबळे यांची भाषणे झाली. प्रारंभी सुकदेव जाधव व विनोद राक्षे, शरद त्रिभुवन यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब संधान, माजी संचालक बाळासाहेब नरोडे, बाळासाहेब आढाव, विनायक गायकवाड, गोपी गायकवाड, संजय पवार, विवेक सोनवणे, दीपक जपे, वैभव गिरमे, दिनेश कांबळे, उत्तमराव सोळसे, बाळू सोळसे, विधीज्ञ नितीन पोळ, नितीन साबळे, सोमनाथ अहिरे, माजी नगरसेवक जंगू मरसाळे आदींसह असंख्य समाज बांधव, नगरपालिका सफाई कामगार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सुकदेव जाधव यांनी मानले.

गळनिंब (वार्ताहर)– श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथेे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ खर्डे होते तर व्यासपिठावर माजी सभापती अण्णासाहेब शिंदे, पत्रकार प्रा.बाळासाहेब वडितके, प्रा. अनिल लोखंडे , आदीनाथ वडितके, सुनील शिंदे, अ‍ॅड. घोरपडे, श्री. शेळके आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक अनिल लोखंडे यांनी विद्यालयाच्या विद्यार्थांना दहा हजार रुपयांची पुस्तके व शालोपयोगी साहित्य दिले. ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी शिक्षक चासकर, भूतकर, सौ वाघ, बेंद्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ. वाघ यांनी केले तर आभार श्री. दळे यांनी मानले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची 97 जयंती लाल निशाण पक्ष(ले)च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना कॉ.जीवन सुरुडे यांनी सांगितले की, कॉ.अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या विचारातून व कादंबर्‍या,लोकनाट्य, कथासंग्रह, पोवाडे, नाटके यांच्या माध्यमातून सातत्याने कष्टकरी व बहुजन समाजाला न्याय व प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, कामगार-शेतकरी व शेतमजुरांचे विविध लढे वाखाणण्याजोगे होते.

त्यामुळे आजही त्यांचे विचार व लिखाण समाजाला आदर्शवत असून त्यांच्या लिखाणाचा व विचारांचा मोठ्या प्रमाणात प्रचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी लाल निशाण पक्ष (ले)चे कॉ. राजेंद्र बावके, कॉ.जीवन सुरुडे, कॉ. मदिना शेख, कॉ.श्रीकृष्ण बडाख, सुयोग ससकर, अजय बत्तीशे, दीपक व्यवहारे, अजय जाधव, सुमित निकम, अमोल गाढवे, शांतवन अमोलीक, अमोले अनुसे , संजय वायकर , सुरज लिप्टे, जगताप बंधू, किरण पवार , कृष्णा नवथर, संकेत वायकर , महेश वायकर, संदेश गायकवाड, अमित पटेकर, सुनील काळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*