Type to search

Video : लग्नसमारंभात सोनसाखळी घालून जाताना सावधान; चोरट्यांचा ग्रामीण भागातही शिरकाव

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : लग्नसमारंभात सोनसाखळी घालून जाताना सावधान; चोरट्यांचा ग्रामीण भागातही शिरकाव

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शहरात भरदिवसा सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र, शहरासोबतच आता ग्रामीण भागातही चोरट्यांनी शिरकाव केल्यामुळे महिला वर्ग चोरट्यांच्या दहशतीखाली आला आहे.

नातेवाईकाच्या लग्नानिमित्त २१ मेच्या दिवशी नाशिकच्या चितेगाव फाट्याजवळील कुलस्वामिनी लॉन्समध्ये येथे पुण्यातील आराधना लोखंडे या आल्या होत्या.

दरम्यान, लॉन्सच्या बाहेर उभ्या असलेल्या लोखंडे यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीचे 9 तोळे सोने चोरटयांनी लांबवल्याची घटना घडली.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात  आहे. ग्रामीण भागात सोनसाखळी चोरटे चोरी करू लागल्यामुळे शहर पोलिसांसोबतच ग्रामीण पोलिसांच्या पुढेही सोनसाखळी चोरट्यांचे मोठे आव्हान आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!