शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार : आदिक

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरात लवकरच प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून आ. भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या 10 लाख रकमेस नुकतीच जिल्हाधिकार्‍यांनी मान्यता दिल्याचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले. गेल्या वर्षापासून शहरातील चेन स्नॅचिंग, गाड्यांची चोरी, लूटमार, दुकानफोडी, रोखण्यात यश मिळावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी होती.
त्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने शहरातील प्रमुख चौकांची पहाणी करण्यात आली. आ. कांबळे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपयाचा निधी दिला. त्यास जिल्हाधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे. सोमवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीत शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, विविध संस्था, सामाजिक मंडळे यांच्यासह नागरिकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन नगराध्यक्षा आदिक, मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगरसेवक व नगरसेविकांनी केले आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून विविध निवडणुकांच्या तोंडावर सीसीटीव्ही लावण्याच्या घोषणा मागील सत्ताधारी करायचे.

LEAVE A REPLY

*