Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कांदा चोरीच्या घटनांची धास्ती; चाळीत बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

Share

बब्बू शेख | मनमाड

मनमाड-मालेगाव आणि कळवण तालुक्यात घडलेल्या कांदा चोरीच्या घटनांचा मनमाड शहर परिसरातील शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यानी मोठा धसका घेतला असून चोरीच्या घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शेतकरी व व्यापाऱ्यांनी खळ्यात,मळ्यात कांदा शेड मध्ये सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात केली आहे.काही व्यापाऱ्यांनी तर तातडीने सीसीटीव्ही बसविले त्यामुळे आता सोन्याचे दिवस आलेल्या कांद्यावरही तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे.

मनमाड शहरात कांदा व्यापाऱ्यांची मोठी संख्या आहे त्यात काही व्यापारी निर्यातदार असून बाजार समितीत शेतकऱ्या कडून कांदा खरेदी केल्या नंतर तो शेड मध्ये नेला जातो तेथे प्रतवारीनुसार कांदा वेगळा केल्यानंतर गोण्यात भरून तो वेगवेळ्या राज्यात आणि विदेशात पाठविला जातो.

सध्या कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली असून जय वस्तूंची किंमत आणि मागणी वाढते त्याच्याकडे चोरटे आपला मोर्चा वळवितात कांदा हा चाळीत-खळ्यात,मळ्यात उघड्यावर ठेवलेला असतो त्यामुळे तो सहज चोरता येतो ही संधी साधून मालेगाव तालुक्यतील कौळाने आणि कळवणच्या मोकभगणी येथे चोरट्यांनी चाळीतील साठवून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा कांदा चोरून नेला.

दोन वर्षापूर्वी देखील कांद्याच्या भावात वाढ झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कांदा चोरीच्या घटना घडल्या होत्या आता ही चोरटे कांदा चोरी करू लागल्याचे पाहून मनमाड शहर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्या सोबत व्यापाऱ्या मध्ये खळबळ उडून त्यांनी एका प्रकारे कांदा चोरीच्या घटनांचा धसकाच घेतला आहे.

काही शेतकरी कांदा चाळीवर खडा पहारा देत आहे काहींनी राखणदार ठेवले तर काही सीसीटीव्ही लावण्याच्या तयारीत आहे काही कांदा व्यापाऱ्यांनी तर तातडीने कांदा शेडवर सीसीटीव्ही बसविले देखील आहे.त्यामुळे कांदा चोरताना चोरट्यांना दहा वेळा विचार करावा लागेल कारण इतर महागड्या वस्तू प्रमाणे कांद्यावर देखील तिसऱ्या डोळ्याची नजर आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!