अकोलेची तेजस साबळे सीबीएसई दहावीच्या परीक्षेत राज्यात द्वितीय

0
अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील आंभोळ येथील भूमिकन्या असणार्‍या तेजस बाळासाहेब साबळे हिने सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत पुणे शहरात प्रथम तर महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल आंभोळ गावासह तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
तेजस चे वडील बाळासाहेब साबळे मूळ आंभोळ चे आहेत. सध्या ते पुणे येथील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर आई अर्चना या शिक्षिका आहेत. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने लहानपणापासून तिला अभ्यासची आवड होती.
तेजस ताथवडे येथील ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये ती शिक्षण घेत आहे. दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत तेजसला 99.4 टक्के गुण मिळाले. ती पुणे शहरात पहिली आली. आपल्या यशाचे श्रेय ती आई, वडील तसेच मुख्याध्यापिका ज्योत्स्ना मिश्रा, पर्यवेक्षिका भावना रॉय व अन्य गुरुजनांना देते.

विशेष म्हणजे आजारपणामुळे तिची शाळा तीन महिने बुडाली तरीही तिने हे यश संपादन केले. तिला 96 टक्के गुण मिळण्याची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात 99 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. हा आपल्याला सुखद आश्चर्याचा धक्का असल्याची भावना तिने दैनिक सार्वमत शी बोलताना व्यक्त केली.तेजसच्या आई अर्चना यांनी आपल्या आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*