Type to search

२०१८ मध्ये सीबीआरईने २ अब्ज डॉलर्सचे व्यवहार; मुंबईतून ४० टक्के उलाढाल

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

२०१८ मध्ये सीबीआरईने २ अब्ज डॉलर्सचे व्यवहार; मुंबईतून ४० टक्के उलाढाल

Share

नवी दिल्ली | यूएनआय

रियल इस्टेट फर्म असलेल्या सीबीआरई साउथ एशिया प्रा. लि. यांनी २०१८ या आर्थिक वर्षात २ अब्ज डॉलर्सचे व्यवहार केले आहेत. यामध्ये सर्वात अधिक उलाढाल मुंबई शहरातून झाली असल्याची माहिती एका निवेदनात देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास ४० टक्के उलाढाल एकट्या मुंबई शहरातून झाली आहे.

कंपनीकडून नुकतेच एक निवेदन जारी करण्यात आले असून यामध्ये कंपनीने कंपनीच्या एकूण ४.७ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीविषयी सांगितले.

कंपनीच्या अधिकृत कामामध्ये कॅपिटल राईजिंग, लँड सर्व्हिसेस, जमीनी विकास, संयुक्त विकास आणि विकास व्यवस्थापन करार, व्यापक मालमत्ता सेवा, कोर अॅसेट सेल्स, एचएनआय आणि फॅमिली ऑफिस सल्लागार आणि फंड पोर्टफोलिओजचे सल्लागार अशा विस्तृत सेवांच्या सुविधेसह, कॅपिटल मार्केट्स टीमने आपल्या क्लायंटला श्रेणीद्वारे मदत केल्याचे सांगण्यात आले.

गुंतवणूक विक्री, विदेशी गुंतवणूक (एफडीआय), संरचित कर्ज, बांधकाम वित्तपुरवठा आणि एलआरडी, इक्विटी प्लेसमेंट, कोर अॅसेट विक्री इत्यादीचाही यात समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!