तूर घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : माजी मुख्यमंत्री चव्हाण

0

मुंबई :  राज्यात तूर खरेदीमध्ये चारशे कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्यांचे मुख्यमंत्री स्वत:च करतात हे गंभीर असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, उच्चपदस्थांचा यात हात असल्याशिवाय इतका मोठा गैर व्यवहार होवू शकत नाही, तसेच स्वत: राज्याचे प्रमुख त्यावर भाष्य करतात त्यामुळे हे गंभीर असून या प्रकरणी सरकारने सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे घोषित करावे अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की सरकारने ज्यावेळी लाल किल्यावरून तूर पिकवण्याचे आवाहन केले त्यावेळी शेतक-यानी त्याला भरघोस प्रतिसाद दिला असे असताना आता सरकारने शेतक-यांन वा-यावर सोडणे योग्य होणार नाही.

नेमकी किती तूर पिकवण्यात आली किती आयात झाली आणि पर राज्यातून किती आली याची माहिती राज्य सरकारने द्यायला हवी मात्र ती दिली नाही.

त्यामुळे हा गोंधळ नसून घोटाळास असल्याची शंका घेन्यास वाव आहे असे चव्हाण म्हणाले. ते म्हणाले की, त्यात फॉरवर्ड मार्केटिंगच्या सटोडीयांचा हात असण्याची शक्यता आहे मात्र सरकारमधून कुणीतरी त्याना मदत करते आहे का याची चौकशी सिबीआय मार्फत करण्यात आली  पाहीजे.

LEAVE A REPLY

*