रेयॉनमधील बालक हत्या प्रकरणाला कलाटणी; ११वीतील विद्यार्थ्याने खून केला

0

नवी दिल्ली, ता. ८ : देशभरात खळबळ उडविणाऱ्या गुरगाव येथील रेयॉन इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न हत्या प्रकरणी सीबीआयने मोठा खूलासा केला असून या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

सीबीआयने आज पत्रकार परिषदेत सांगितले की प्रद्दुम्नची हत्या संशयित बस ड्रायव्हर किंवा कंडक्टरने केली नसून त्याच शाळेत ११वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केली आहे.

त्याचप्रमाणे त्याचे लैंगिक शोषणही झाले नसल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले. संबंधित विद्यार्थ्याला सीबीआयने ताब्यात घेतले असून केवळ ११वीची परीक्षा पुढे ढकलली जावी यासाठी त्याने प्रद्दुम्नला ठार केल्याची धक्कादायक माहिती आता पुढे येत आहे.

त्याने ज्या हत्याराने प्रद्दुम्नची हत्या केली त्याचा शोध सीबीआय घेत असून त्याला आज बालन्यायालयात नेण्यात येणार आहे.

शाळेच्या शौचालयात दुसरीतील प्रद्युम्न ठाकूर या बालकाची हत्या करण्यात आल्याची घटना या शाळेत  घडली होती. बस कंडक्टरने ही हत्या केली या संशयाने त्याला ताब्यात घेतले होते.

तसेच या संदर्भात रेयॉन शाळेच्या तीन ट्रस्टींनाही अटक करण्यात आली आहे.

गुडगाव : शाळेच्या टॉयलेटमध्ये आढळला मुलाचा मृतदेह

LEAVE A REPLY

*