मांजरीचं पिलू पोटाला बिलगलं! माकडीणनेही दूध पाजत मातृत्व निभवलं

0
मनमाड बब्बू शेख | : जागतिक मातृदिन अर्थात १४ मे! तसा पाश्‍चात्य देशातून आपल्याकडे आला. आजच्या दिवशी आईचे गोडवे गाणार्‍या कविता, जड-जड अन् ममत्वाचा पाझर नसलेले लिखाण करून अनेकांनी आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

यामुळे वर्षभर दुर्लक्षित राहणारी किंवा वृद्धाश्रमात बसून  लेकाची वाट बघणार्‍या आईचा उर या औपचारिक प्रेमाने  भरून आला असेल की नाही हे सांगता येत नाही परंतू आज मनमाड मध्ये घडलेल्या एका  प्रसंगाने तुमचे मन नक्कीच भरून येईल.

वेळ भर दुपारची. जिथे माणसाला क्षणभर पाणी नसलं तर जीव जाईल असं वाटतं इतकी भयान उष्णता. त्यात एैन मातृदिनाच्या तोंडावर मातृछत्र हरपलेली दोन मांजरीचे पिलं माव, माव करत जीवाचा आकंत करत होती.

त्याचा ठाव    पाण्याच्या शोधात असलेल्या एका माकडीणीला लागला तशी ती त्या पिलाजवळ गेली अन् तीनं त्याला कुशित घेतलं. हा सर्व प्रकार गेल्या काही दिवसापासून या पिलांना विकत दूध आणून मातृत्व निभावणारा टेलर बघत होता.

या मांजरीच्या पिलांना ही माकडीण काही इजा करेल असं एका क्षणी वाटत असतांना दुसर्‍याच क्षणी मांजरीचं पिलू तिच्या पोटाला आई असल्यागत बिलगलं अन् तिने ही मग आपलं दूध पाजत मातृत्व निभवलं.  हा सर्व प्रकार घडत असतांना एव्हाना बघ्यांनी गर्दी केली होती. आजच्या स्वार्थी जगात स्वत:च्या पोटचा गोळा पण फक्त ती मुलगी म्हणून प्रसूती नंतर  कचराकूंडीत टाकून पसार होणारे आई-बाप आहेतच शिवाय स्त्रि-भ्रूण हत्येचाही गंभीर विषय आहे.

असे असतांना दुसरीकडे एका मुक्या जीवाकडून मनमाडकरांना मिळालेली मातृत्वाची शिकवण आणि तीही मातृदिनी मिळाल्याने सर्वांचेच डोळे पाणावले. आता हा सर्व प्रकार फक्त जागेवर न विसरता त्या माकडीनीने दिलेली मातृत्वाची शिकवण तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात ठेवली तरी मातृदिन साजरा झाल्याचे समाधान मिळेल!

इथे भरभरून वाहतो मातृत्वाचा झरा : दरम्यान मातृछत्र हरपलेल्या ह्या मांजरीच्या पिलांचे मातृत्व एका टेलरने स्विकारले असून दै. देशदूतने त्यांची प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रसिद्धी नको म्हणून प्रतिक्रीया देण्याचेही टाळले आणि नाव छापू नये अशीही विनंती केली. यामुळे जगात ममत्वाचा पाझर आटत असला तरी मांजरीच्या पिलांचे पालकत्व निभावणार्‍या टेलरकडे तो  भरभरून वाहतांना दिसते.

LEAVE A REPLY

*