जात पडताळणी समितीकडून 12 हजार प्रकरणे निकाली

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा जातपडताळणी समितीने पाच महिन्यांत तब्बल 11 हजार 787 प्रकरणे निकाली लावली आहे. तर, 2 हजार 149 प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा जात पडताळणी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
नाशिक येथे असलेले जात पडताळणी कार्यालय डिसेंबर 2016 मध्ये नगर येथे आले. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होणारी धावपळ व होणारा आर्थिक खर्च वाचला आहे. शैक्षणिक, निवडणूक व सरकारी नोकरीसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.नगर कार्यालयात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग आदींसह इतर मागास वर्ग यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करता येवू शकतो. अनुसूचित जमाती वगळता सर्वासाठी नगर कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मिळत आहे.

नगर येथे नविन कार्यालय सुरु झाल्यावर जिल्ह्यातील नाशिक येथे प्रलंबित असलेले सुरवातीची सुमारे 8 हजार प्रकरणे मार्गी लावताना नविन प्रकरणे मागे पडण्याचे प्रमाण वाढल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलबिंत असल्याचे संबधित विभागाकडून सांगितले जात आहे. जानेवारी 2017 मध्ये सर्वाधिक 10 हजार 658 प्रकरणे होती. दरम्यान प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केल्याने चार महिन्यांत त्याचे प्रमाण कमी होवून मे अखेर 2 हजार 149 प्रलंबित प्रकरणे दिसून येत आहेत.

शैक्षणिक प्रकरणांची संख्या सर्वाधिक –
जात पडताळणी समितीकडे पाच महिन्यांत शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणार्‍या प्रमाणपत्राची संख्या सर्वाधिक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे व शुल्क कमी करण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे प्रकरणे अधिक आहेत. यामध्ये सेवा प्रकरणे 730 तर, निवडणूक 115 अशी 11 हजार 787 प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समिती सदस्य दाणे यांनी दिली

LEAVE A REPLY

*