Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानवनीत राणा यांना अटक होणार?

नवनीत राणा यांना अटक होणार?

मुंबई | Mumbai

खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत.

- Advertisement -

यापूर्वी देखील शिवडी न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट जारी केले होते. या विरोधात सत्र न्यायालयात राणा यांनी धाव घेतली होती. मात्र न्यायालयात कुठल्याही प्रकारच्या वॉरंटला स्थगिती मिळाली नव्हती. त्यामुळे कारवाई करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने दिले आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी जून महिन्यात राणा यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचे सांगत त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं होतं. राणा यांना दोन लाखांचा दंडही उच्च न्यायालयाने सुनावला होता.

मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर जून 2021मध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या