जातीच्या दाखल्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज; अ‍ॅट्रासिटीची प्रकरणे फास्टट्रॅक कार्टात चालवणार

0
नाशिक । जातीवाचक शिवीगाळ (अ‍ॅक्ट्रासिटी) प्रकरणे तातडीने निकाली निघावीत यासाठी ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याकरीताही पाठपूरावा केला जाणार आहे. अनेक वेळा गुन्हा दाखल करतांना तक्रारदाराकडे जातीचा दाखलाच नसतो याकरीता पोलीस ठाण्यातच जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा दक्षता समितीच्या बैठकित घेण्यात आला.

या बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थ्ति होते. जिल्ह्यातील पोलीस स्टेशन्समध्ये दाखल आणि कोर्टामध्ये प्रलंबित अ‍ॅक्ट्रासिटीच्या गुन्ह्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्ह्यात अ‍ॅक्ट्रासिटीच्या 178 केसेस प्रलंबित असल्याची माहिती या बैठकीत पुढे आली. जिल्ह्यात आदिवासी बांधवांची तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची संख्या मोठी असून त्यामुळेच अ‍ॅक्ट्रासिटीच्या दाखल गुन्ह्यांचे प्रमाण देखील अधिक आहे.

या खटल्यांचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी त्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाव्यात अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडून प्रधान जिल्हा न्यायाधिशांना करण्यात येणार आहे. याखेरीज जुन्या प्रलंबित केसेस निकाली निघाव्यात यासाठी देखील पाठपूरावा करण्यात येणार आहे.

अ‍ॅक्ट्रासिटीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिक पोलीस स्टेशन्समध्ये येतात. परंतु काही नागरिकांनी जातीचा दाखला काढलेलाच नसतो. अशा तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारल्या जात असल्या तरी त्यांनी लवकरात लवकर जातीचा दाखला काढून घ्यावा, असे पोलिसांकडून सांगितले जाते.

परंतु तहसिल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जातीच्या दाखल्यासाठीचा अर्ज घेण्यास लोक कंटाळा करतात. त्यामुळे पोलीस स्टेशनमधूनच असे अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्व पोलीस स्टेशन्सला हे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अ‍ॅक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या परंतु जातीचा दाखला न काढलेल्या नागरिकांना हे अर्ज दिले जाणार आहेत

LEAVE A REPLY

*