‘बॉश’ प्रकरणी घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

0
नवीन नाशिक| प्रतिनिधी – बॉश कंपनीतील ११ कोटीच्या स्पेअर पार्ट चोरीप्रकरणी मास्टरमाईंड छोटू चौधरी याचे राजकीय हितसंबंध उघडकीस आल्यानंतर आज अंबड पोलिसांनी भाडेकरुची माहिती लपविल्याप्रकरणी घरमालक रेहमतुल्ला मोहम्मद रईस चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पंडितनगर परिसरातील एन ४१बीबी २/३/१५ या घरात मिनी बॉश कंपनीचा कारभार सुरू होता. यातील मुख्य सूत्रधार ताहीरअली मोहम्मद इदरिस चौधरी उर्फ छोटू चौधरी (३६, रा. अजमेरीनगरल गल्ली नं. ३, सातपूर-अंबड लिंकरोड, नाशिक) याने रेहमतुल्ला चौधरी यांच्या नावावर असलेले घर भाडेतत्त्वावर घेतले होते. ऑक्टोबर २०१७ पासून तो या घरात राहात असताना बॉश कंपनी उत्पादित स्पेअरपार्टची नक्कल करून डुप्लीकेट स्पेअर पार्ट तयार करण्याचा कारखानाच या ठिकाणी सुरू केला होता.

याप्रकरणाची चौकशी सुरू असताना घरमालक रेहमतुल्ला चौधरी यांनी छोटू चौधरीला घर भाडेतत्त्वावर देताना त्याच्याशी कोणताही करारनामा केलेला नव्हता. तसेच भाडे संदर्भातील माहिती पोलीस ठाण्यात दिलेली नसल्याचे आढळून आले.
या प्रकाराची गांभिर्याने दखल घेत अंबड पोलिसांनी अब्दुल मोबीन हाजी अहमद खान व रेहमतुल्ला चौधरी यांच्या विरुद्ध भा.दं.वि.क. १८८ नुसार पो.ह.संपत निकम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*