अभिनेत्री वाणी कपूर आणि कुटुंबियांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

अभिनेत्री वाणी कपूर आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीच्या मुखर्जीनगर पोलीस ठाण्यात तिचे वडील शिव कपूर आणि आई डिंपी कपूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 420, 120 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वाणी आणि तिच्या कुटुंबावर एकच मालमत्ता अनेक वेळा विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रितु त्यागी नावाच्या महिलेने कपूर कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण 2008 मधील आहे. रितु यांनी शिव कपूरकडून 55 लाखाचे एक घर विकत घेतले. नंतर, बँकेने घराबाहेरच्या लिलावाची नोटीस लावली. तेव्हा असं कळाले की, या घरावर आधीच लोन आहे. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

LEAVE A REPLY

*