Type to search

मार्केट बझ

सावध पाऊल

Share

भारतात रिलायंस रिटेलने त्यांच्या व्यवसायासाठी कोट्यावधी किराणा दुकाने त्यांच्या इ कॉमर्स चॅनलबरोबर जोडण्याची तयारी चालविली असून त्यामुळे अगोदरच सावध झालेल्या फ्लिपकार्ट या वॉलमार्ट ने अधिग्रहित केलेल्या इ कॉमर्स कंपनीने अगोदरच पावले उचलली आहेत. कंपनीने देशातील 15 हजार छोटी दुकाने, बेकर्या, किराणा माल दुकाने, ब्युटी सलून, फार्मसी सह अन्य दुकाने जोडण्याचे व या दुकानांचा वापर डिलिव्हरी एजंट मधून करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

कंपनीने तेलंगणातील 800 छोट्या दुकानदारांच्या माध्यमातून पायलट प्रोजेक्ट सुरु केला आहे आणि फ्लिपकार्टच्या अ‍ॅपच्या सहाय्याने तेथे स्मार्टफोन विक्री केली जाणार आहे. ज्या दुकानानातून फ्लिपकार्टला फोनची ऑर्डर मिळेल तेथे हे फोन पाठविले जात असून या दुकानातून ग्राहकांना फोन डिलिव्हरी मिळणार आहे. त्याबदली दुकानदारांना मार्जिन दिले जाणार आहे. हे किराणा दुकानदार फ्लिपकार्टच्या अ‍ॅपवर वेगळ्या लिंकने व्यवसाय करू शकणार आहेत.

भारतात वेगाने ई कॉमर्स व्यवसाय वाढत आहे आणि फूड ते फॅशन अश्या विविध विभागात दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होत आहे, तरीही आजही देशात 95 टक्के रिटेल बिझिनेसवर फिजिकल स्टोर्सची पकड आहे. रिलायंस या वर्षात ई कॉमर्स सेग्मेंट मध्ये उतरत आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र बनत आहे. फ्लिपकार्टने तेलंगणात सुरु केलेल्या पायलट प्रोजेक्ट मध्ये दरमहिना 15 ते 20 कोटीचे स्मार्टफोन विकले जात असल्याचे कंपनीचा उत्साह वाढला आहे.

त्यामुळे आगामी महिन्यात हे मॉडेल देशभरात सुरु केले जात असून त्याचा फायदा कंपनी, दुकानदार आणि ग्राहक असा सर्वाना होणार आहे असे सांगितले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!