Wednesday, April 24, 2024
Homeशैक्षणिककार्डियाक केअर टेक्निशियन व्हा !

कार्डियाक केअर टेक्निशियन व्हा !

कार्डियाक केअर टेक्निशियन हे वैद्यकीय क्षेत्रात करियरचा एक दमदार पर्याय मानला जातो. ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे आहे परंतु त्यांना पूर्णवेळ परिचारिका किंवा डॉक्टर व्हायचे नाही, अशा तरुण-तरुणींसाठी कार्डियाक केअर टेक्निशियन क्षेत्र उत्तम मानले जाते. मोठमोठ्या रुग्णालयात कुशल टेक्निशियनची मागणी वाढत चालली आहे. रुग्णांचे वाढते प्रमाण आणि रुग्णालयाची गरज पाहता आगामी काळात कार्डियाक केअर आणि रुग्णालयाची गरज पाहता आगामी काळात कार्डियाक केअर टेक्निशियन हा करियरमधील महत्त्वाचा घटक ठरणार आहे.

एखाद्या रुग्णावरील शस्त्रक्रिया असो, रक्तदाब तपासायचा असो किंवा रक्त लघवी तपासायची असेल किंवा एक्स-रे काढायचा असेल तर ही सर्व कामे डॉक्टर किंवा तज्ञ डॉक्टर करू शकत नाही. यासाठी त्याला माहितगार मदतनीसाची नितांत गरज भासते. ही गरज टेक्निशियन पूर्ण करू शकतो. विशेषत: हृदयविकार असलेल्या रुग्णांवर उपचार करताना कार्डियाक केअर टेक्निशियन अत्यावश्यक असतो. कार्डियाक केअर टेक्निशियनला आपण काडियोवॅक्स्कुलर टेक्नॉलॉजिस्ट सुद्धा म्हणू शकतो. आजघडीला वैद्यकीय क्षेत्रातील चांगला पर्याय मानला जातो. कार्डियाक केअर टेक्निशियन हे एखाद्या वैद्यकीय व्यवसायिकाप्रमाणे काम करत असतात. कार्डियाक टेक्निशियन रुग्णांच्या विविध चाचण्या करून घेण्यासाठी मदत करतात आणि रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांना साह्यभूत ठरतात. या टेक्निशियनच्या मदतीशिवाय कोणताही डॉक्टर किंवा सर्जनला उपचाराची पूर्ण प्रक्रिया पार पाडता येत नाही. एक एकप्रकारे टेक्निशियन हे डॉक्टरांचे डोळा आणि हात म्हणून काम करत असतात. जर संक्षिप्तरुपाने म्हटले तर टेक्निशियन हे रुग्णांच्या रिपोर्टचे विश्लेषण करत असतात. रुग्णाच्या हृदयाची काळजी घेण्याचे काम सहायक तंत्रज्ञ करत असतात.

- Advertisement -

कार्डियाक टेक्निशियन उपचाराची प्रक्रिया, वॅक्स्कूलर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी फिजिशियनची मदत करत असतात. त्यांचे काम प्रशिक्षण आणि अनुभवाच्या आधारावर निश्चित होते. हे टेक्निशियन इलेक्ट्रोकार्डियोग्राम आणि प्रशिक्षण देखील करत असतात. अनुभवानंतर हे टेक्निशियन ओपन हार्ट सर्जरीतही सर्जनची मदत करत असतात. जर हेल्थकेअर सेक्टरचा विचार केला तर कार्डियाक केअर टेक्निशियनमध्ये करियर करणे हा उमेदवारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या क्षेत्रात करियरला आणखी वाव देण्यासाठी सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री प्रोग्रॅम्स उपलब्ध आहेत. या क्षेत्राची ज्यांना आवड आहे, त्यांना अधिक अनुभव देण्याचे काम हे अभ्यासक्रम करतात. यासंदर्भात दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकलच्या प्राचार्य अरुणा सिंह म्हणतात, की देशातच नाही तर परदेशातही पॅरामेडिक्सची मागणी वाढत आहे. देशभरात सरकारीशिवाय खासगी रुग्णालयात वाढत्या रांगा पाहता भविष्यात या क्षेत्रात करियरच्या विपूल संधी आहेत, असे दिसून येते.

जॉब प्रोफाईल :
प्राचार्य अरुणा सिंह म्हणतात, की एखाद्या कार्डियाक केअर टेक्निशियनचा मुख्य हेतू हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे हृदय आणि रक्तपेशींच्या उपचारासाठी डॉक्टरांची मदत करणे हा असतो. दवाखान्यात दाखल असलेल्या हृदयविकार रुग्णांच्या तपासण्या करणे, नियमित देखभाल, शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतर आवश्यक ती खबरदारी घेणे, रुग्णांना घरी सोडल्यानंतर काळजी घेण्याबाबत सूचना देणे या सर्व गोष्टी टेक्निशियन पार पाडत असतो. कारण डॉक्टरकडे तेवढा वेळ नसतो. म्हणून प्रत्येक रुग्णांचे रेकॉर्ड तंत्रज्ञ पाहत असतो. एवढेच नाही तर नियमित तपासणीसांठी येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीत देखील डॉक्टरांना मदत करण्याचे काम तंत्रज्ञला करावे लागते.

आवश्यक कौशल्य :
रुग्णालयात टेक्निशियन म्हणून काम करत असताना काही प्रॅक्टिकल स्किल देखील येणे गरजेचे आहे. कारण एक कार्डियाक केअर टेक्निशियन ऑपरेशनच्या काळात डॉक्टरांसाठी दोन्ही हात म्हणून काम करत असतो. यादरम्यान झालेली किरकोळ चूकही रुग्णाचे आयुष्य धोक्यात घालणारे ठरू शकते. त्यामुळे ऑपरेशनच्या काळात सर्व परिस्थितीवर मात करण्याची तयारी असणे आणि मशिनची माहिती ठेवणे गरजेचे असते. मॉनिटर आणि रिकॉर्डरमध्ये तार जोडण्यासंदर्भातील ज्ञान, चांगल्या कनेक्शनसाठी रिदम स्ट्रिप किंवा लीड ट्रेसिंग रेकॉर्ड ज्ञान, तांत्रिक ज्ञानासाठी ईसीजी वेवफॉमची ओळख पटवण्यात प्रावीण्य असणे, आर्टफॅक्ट फ्री ट्रेसिंंग आणि योग्य लीड स्थापन करण्याची बुद्धिमत्ता असणे, लीड काढण्यासाठी आणि सेन्सर साईटला स्वच्छ करण्याच्या पद्धती, ड्रेसिंग साधनात आवश्यक मदत पुरवणे, फिनिशिंग ऑपरेशनमध्ये मदत करणे, उपकरण संचलनातील प्रक्रियेत ज्ञान, मानवी शरीराच्या अनाटॉमी आणि फिजिओलॉजी, विशेषत: कार्डिओ व्हॅक्सूलर सिस्टिम संबंधी यंत्रणेची माहिती आदींचे कौशल्य असणे गरजेचे आहे. जर वैयक्तिक कौशल्याचा विचार करायचा असेल तर टेक्निशियनमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी असायला हवी. त्याचबरोबर संवादकौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, संघटन कौशल्य या गोष्टी अंगी असणे गरजेचे आहे. जर आपल्यात अशा प्रकारचे ज्ञान असेल आणि काम करण्याची तयारी असेल तर हे या करियरमध्ये चांगली उंची गाठू शकता.

पात्रता :
या क्षेत्रात अभ्यासक्रम करण्यासांठी उमेदवाराला १२ विज्ञान उत्तीर्ण असणे आणि मान्यताप्राप्त बोर्डची परीक्षा पास होण्याची आवश्यकता आहे. याशिवाय अनेक कॉलेज या क्षेत्रातील सर्टिफिकिेट कोर्सेस उपलब्ध करून देतात. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर या अभ्यासक्रमाच्या मदतीने चांगले करियर करता येते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स म्हणजेच बीएससी इन कार्डियाक केअर टेक्नॉलॉजी सुद्धा करू शकतो. आपल्या करियरला चांगला आकार देऊ शकतो.

वेतन :
पॅरामेडिकलची वाढती मागणी देशातच नाही तर परदेशातही वाढत आहे. देशभरात सरकारीबरोबरच खासगी रुग्णालयातही वाढत्या रांगा लक्षात घेता या क्षेत्रात भरपूर रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. वेतनाचा विचार केल्यास प्रारंभीच्या काळात एक कार्डियाक केअर टेक्निशियन २० ते ३० हजार रुपये मासिक वेतन घेऊ शकतो. कालांतराने अनुभवाच्या जोरावर त्यात वाढ होत जाते. याशिवाय उमेदवार सरकारी रुग्णालयात देखील परीक्षा शकतो.

प्रमुख संस्था
१ दिल्ली पॅरामेडिकल अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली
२ महर्षी मार्कंडेश्वर यूनिर्व्हर्सिटी, अंबाला हरियाना
३ शिवलिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चंडीगड
४ इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग जालंधर, पंजाब

- Advertisment -

ताज्या बातम्या